वसई : वसई गाव पश्चिमेतील पारनाका परिसरात वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा वाहने पार्किंग मुळे पारनाका ते जानकी सिनेमागृह या परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.शहराला वाहतूककोंडीने ग्रासले आहे. ठीकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यामुळे येथील नागरीक मेटाकुटीला आले आहे. पारनाका परिसरात या होणाºया वाहतूक कोंडी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात पोलिसांची चौकी व वसई विरार महापालिकेचे कार्यालय देखील आहे. मात्र, त्यांच्या विभागामार्फत या बेकायदा उभ्या राहणाºया वाहनचालकावर कारवाई केली जात नसल्याने येथील नागरिक तासनतास या कोंडीमध्ये अडकून पडत आहेत.पादचाºयांना रस्त्यावर नीट चालता येत नसल्याने त्यांना ही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात येणाºया वाहनांची संख्या देखील मोठ्याप्रमाणात आहे. व रस्ते देखील निमुळते आहेत. त्यातच अनेक वाहने बेकायदेशीररित्या रस्त्याच्या कडेने उभी केली जात आहेत. यामुळे यापरिसरात दररोज वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मुळे अनेकांना इच्छित स्थळी जाण्यास उशिर होता.वाहतूक कोंडी सुटावी यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने प्रयत्न सुरूच आहेत. तसेच जे नियमांचे उल्लघन करतात त्यांच्यावर देखील कारवाई केली जात आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस्या देखील मोठी असल्याने हळूहळू त्याला नियंत्रणात आणणाचे काम व नवीन उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.- संपतराव पाटील,वाहतूक नियंत्रण विभाग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वसईतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 11:29 PM