पारोळ : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलीबाग यांच्या सौजन्याने गांधी जयंती निमित्त वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम राबवण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून हजारोच्या संख्येने श्रीसदस्य स्वच्छतेसाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते.ही स्वच्छता मोहिम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी १५.९ टन ओला कचरा, ३५.४९ टन सुका कचरा असा एकूण ५०.५८ टन कचरा संकलित करण्यात आला. शहरातील २६६ किमी परिसरात एकूण ६,०४७ श्रीसदस्यांचा स्वयंस्फूर्तीने या स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे सातत्याने व्यापक स्वरु पात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून दि. १६ नोव्हेंबर २०१४ रोजी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची नोंद लिमका बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानने दिले होते.पारोळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती वसई व ग्रुप ग्राम पंचायत खानिवडे यांच्या संयुक्त विध्यमाने महात्मा गांधी जयंती निमित्त संत गाडगेमहाराज स्वच्छता अभियान अंतर्गत सुरु झालेल्या स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत खिनवाड्यातील शेतकरी शरद किणी यांच्या शेततळ्याचे जलपूजन व ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे उदघाटन पालकमंत्री विष्णू सवरा, कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालघरचे खासदार चिंतामण वनगा, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, स्थायिक आमदार विलास तरे , जि.प. अध्यक्ष विजय खरपडे, पं. स. सभापती संजय म्हात्रे उपस्थित होते.
धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान , ५० टन कच-याचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:02 AM