शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

डहाणूत पुन्हा घड्याळाची टिकटिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 1:15 AM

डहाणू तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून या पक्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले.

अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : डहाणू तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून या पक्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले. तर शिवसेनेच्या भगव्याची जादू दिसून आली. या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जल्लोष करीत असताना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने भाजप आणि माकपच्या गोटात उत्साहाचा अभाव दिसला. मसोली येथील सेंट मेरीज हायस्कूल येथे ही मतमोजणी पार पडली.विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच या वेळीही जिल्ह्यात सर्वाधिक उशिरा मतमोजणी डहाणू येथे पार पडली. त्यामुळे सात तालुक्यात विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु असताना दुपारी दीडच्या सुमारास निकाल घोषित न झाल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. तत्पूर्वी सायवन गटाचे उमेदवार काशिनाथ चौधरी यांनी सायवन, मोडगाव आणि कासा गट आणि गणात पक्ष आघाडीवर असल्याची माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरून वातावरणातील मरगळ झटकली गेली. तर गंजाड गट-गणात शिवसेनेने वर्चस्व राखल्याचा संदेश निरोप्या घेऊन आल्यावर सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्व. आ. कृष्णा घोडा यांच्या नावाचा जयघोष सुरु केला. त्यानंतर सर्वच पक्षाच्या विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांना येऊन भेट घेण्यास प्राधान्य दिले. बोर्डी गटात या गणाचे पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी गट राखण्यासह बोर्डी गण लक्ष्मी कुºहाडा आणि अस्वाली गण बाळा कांबळी यांनी तर कैनाड गट जयवंत डोंगरकर आणि रोहिणी निमला यांनी राखल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या गोटात उत्साह संचारला होता. माकप, काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अस्तित्व जाणवले नाही. निवडणुकीच्या दिवशी जोशात असलेले बविआ कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या आवारात दिसलेच नाही. संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर शहरासह गावोगावी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचे वाटप केले.दरम्यान, मतमोजणी केंद्रासमोरून जाणारा शहरातील मुख्य रस्ता साडेआठनंतर रहदारीसाठी बंद करण्यात आला. शिवाय पारनाकामार्गे बोर्डीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी जाणाºया मार्गाचे वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्याने आंबेडकर नगर या आंतरिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास झाला. मतदानाच्या दिवशी ठराविक तासाने येणारी मतदानाची टक्केवारी आणि पत्रकारांना विधानसभेवेळी सापत्न वागणूक मिळाल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी काळात हजर न राहून प्रशासनाचा निषेध नोंदवला.।एकच वादा, काशिनाथ दादाविधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील झाल्याने डहाणू सभा क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाचे जि.प. सदस्य काशिनाथ चौधरी यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागले होते. या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली लढताना पक्षाने घवघवीत यश मिळवल्याने, कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा, काशिनाथ दादा ’ अशा घोषणा देत सर्वाधिक पुष्पहार त्यांनाच घातले तर पक्षश्रेष्ठींनी पाठ थोपटली. डहाणू-बोर्डी वाहतूक नियोजन वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने वाहतूक कोंडीने डहाणूतील नागरिक त्रस्त.।पालघर जिल्हा परिषद गटाचेविजयी उमेदवार १३१) बोर्डी- ज्योती प्रशांत पाटील (भाजप)२) मोडगाव- मंदा काशिनाथ घरट (राष्ट्रवादी)३) सायवन- काशिनाथ गोविंद चौधरी (राष्ट्रवादी)४) गंजाड - अमिता अमित घोडा (शिवसेना)५) कैनाड- जयवंत दामू डोंगरकर (भाजप)६) धामणगाव- सतीश सीताराम करबट (अपक्ष)७) ओसरविरा- शैलेश काळूराम करमोडा (राष्ट्रवादी)८) कासा- जयश्री संतोष केणी (राष्ट्रवादी)९) जामशेत- कली बाबू वळवी (भाजप)१०) सरावली - सुनील दामोदर माच्छी (भाजप)११) धाकटी डहाणू- जयेंद्र किसन दुबळा (शिवसेना)१२) चिंचणी- देवानंद सुरेश शिंगडे (काँग्रेस)१३) वणई- सुशील किशोर चुरी (शिवसेना)डहाणू पंचायत समितीच्या२६ गणापैकी विजयी पक्षांचे उमेदवार राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७,माकप २,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (९)१) राजेश महादू सुतार (हळदपाडा)२) प्रवीण महादू गवळी (मोडगाव)३) पिंटी रमेश बोरसा (सायवन)४) अरु णा सुनील भावर (चळणी)५) स्नेहलता सीताराम सातवी (शेणसरी)६) स्वाती विपुल राऊत (ओसरविरा)७) अरु ण चिंतू कदम (कासा)८) शैलेश माधव हाडळ (मुरबाड)९) विक्र ांत सतीश पटेल (वाणगाव)।शिवसेना पक्ष (८)१) सुवर्णा दिलीपतांडेल (आंबेसरी)२) सुभाष गोविंद चौरे (विवळवेढे)३) सविता संजीव धिंडे (गंजाड)४) काजल सुरेंद्र राबड (धाकटी डहाणू)५) भुनेश दाजी गोलीम (आसनगाव)६) सुनील भिमाभाई धोडिया (चिंचणी)७) जयश्री जगदीश करमोडा (वनई)८) पिंटू धर्मा गहला (रणकोळ)>भाजप (७)१) लक्ष्मी संदेश कुºहाडा (बोर्डी)२) बाळा दत्तात्रेय कांबळी (अस्वाली)३) प्रवीण पांडुरंग तांडेल (रायतळी)४) वसंत रडका गोरवाला (जामशेत)५) रोहिणी सचिन निमला (चिखले)६) अल्पेश रमण बारी (सरावली)७) मधुरता पागधरे (डेहणे)माकप (२)१) नैना जेठ्या खिवरा (धामणगाव)२) सुमित्रा चंदू बरफ (कैनाड)