पालघर - पडघे, बिरवाडी येथील २० वर्षा पासून बंद पडलेली एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. बाबा कदम ह्यांच्या हस्ते चालक-वाहकांचा सत्कार करून शनिवार पासून ह्या सेवेला सुरु वात करण्यात आली.पडघे, बिरवाडी येथून पालघर व बोईसर मधील कारखान्यात जाणारा कामगार वर्ग, शाळांत,महाविद्यालयात जाणारा विद्यार्थी वर्ग, भाजीपाला विक्र ीसाठी मुंबईत नेणारा शेतकरी वर्ग ह्यांना एसटी नसल्याने पायपीट करीत ३-४ किलोमीटर्सवर असलेल्या उमरोळी येथे यावे लागते होते. तेथून मग बस,रिक्षा अथवा रेल्वेने पालघर, बोईसरकडे यावे लागत होते.मागील २० वर्षांपासून बंद पडलेली ही एसटी पुन्हा सुरळीत सुरू करण्यात भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष.प्रशांत पाटील यांच्या प्रयत्नाना यश आले.पालघरचे विभागीय नियंत्रक अजित गायकवाड ह्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादा नंतर पडघे,बिरवाडी येथे जाण्यासाठी शनिवारपासून एसटी सुरू करण्यात आली. तिचे उदघाटन ज्येष्ठ नेते प्रल्हाद (बाबा) कदम, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस.समीर पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले.या उदघाटन प्रसंग भावीन पटेल, बोईसर मंडळ अध्यक्ष.महावीर जैन, सरचिटणीस विजय पाटील, दिपेश चुरी, पडघे व बिरवाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
बंद केलेली एसटी २० वर्षांनी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:40 AM