शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

पालघर नगरपरिषदेच्या घंटागाड्या बंद

By admin | Published: July 06, 2016 2:23 AM

या नगरपरिषदेने स्वयंरोजगार कार्यक्रमाव्दारे सोळा लाभार्थ्यांना वैयक्तीक व्यवसाय योजनेतून दिलेल्या घंटागाडयांची तीन महिन्यांची बिले थकविली आहेत. त्यामुळे त्या घेण्यासाठी घेतलेल्या

पालघर : या नगरपरिषदेने स्वयंरोजगार कार्यक्रमाव्दारे सोळा लाभार्थ्यांना वैयक्तीक व्यवसाय योजनेतून दिलेल्या घंटागाडयांची तीन महिन्यांची बिले थकविली आहेत. त्यामुळे त्या घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे अवघड झाले आहे. त्यात प्रतिदीन रक्कमेतून ४६० रू कमी करण्यात आल्याचे आता सांगण्यात येत असल्याने ते दुहेरी आर्थिक संकटात सापडले असून त्याच्या निषेधार्थ लाभार्थ्यांनी आपल्या गाडया नगरपरिषदेसमोर उभ्या करून निषेध व्यक्त केलाकेंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजवीका उभियान आणि राज्यशासन पुरस्कृत राज्य नागरी उपजिवीका अभियातंर्गत पालघर नगरपरिषदेच्यावतीने सोळा लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ लाख ११ हजार किंमतीच्या सोळा गाडया देण्यात आल्या. मात्र, लाभार्थी निवडतांना झालेल्या विलंबामुळे या गाडया काही महिने पडून होत्या. लाभार्थ्यांने ५ वर्षाच्या मुदतीत ११ हजार रूपये प्रतिमहिना बँकेत जमा करण्याचे बंधन लाभार्थ्यांना घालण्यात आले होते. प्रत्येक लाभार्थ्यांने तीस हजाराची आगाऊ रक्कम महाराष्ट्र बँकेत जमा केली होती. परंतु प्रत्येक गाडी मागे प्रतिदिन १ हजार ६०० रू. देण्याचे लाभार्थ्यांना तोंडी सांगण्यात आल्याचे अनिल पसळेकर यांनी सांगितले. मात्र आता तीन महिन्यानंतरही या बाबत कुठलाही लेखी करार न करता तुम्हाला १ हजार १४० रू. म्हणजे प्रतिदिन ४६० रू. कमी देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आल्याने लाभार्थ्यांना धक्काच बसला.या घंटा गाडया घाणीची विल्हेवाट लावण्याकरीता नेमण्यात आल्या होत्या. यातील अडचणी दूर करण्याचे प्रयत्न नगरपरिषद पातळीवरून सुरू असल तरी अनेक ठिकाणी कचरा पडून आहे. (वार्ताहर)न परवडणारा व्यवसाय : ११,१०० रू.चा बँक हप्ता, ९ हजाराचे डिझेल, ८ हजार चालकाचा पगार, २ हजार मेंटेनन्स, २ हजार घसारा पकडता महिन्याला ३२ हजार रूपयांचा खर्च वजा जाता हाती फक्त २०० रू. शिल्लक उरत असल्याने एवढयाश्या रक्कमेत घराचा उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थिती केला आहे. अशा वेळी प्रतिदिन ४६० रूपये कमी केल्याने होणारा पालिकेचा महिन्याचा १३ हजार ८०० रू. चा फायदा कोणाच्या खिशात जाणार? असा सवालही लाभार्थी विचारत आहेत.