पालघर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे २ एप्रिल रोजी प्रचारासाठी आले असताना पालघर नगरपरिषद हद्दीत विनापरवाना प्रचार स्टेज, बॅनर, लावल्या बद्दल भाविक डिजिटल, पालघर सह अन्य लोकां विरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी दोन एप्रिल रोजी पालघर मध्ये सेना प्रमुख उद्धव ठाकरे हे वसईचा दौरा आटपून येणार असल्याने पालघरच्या हुतात्मा स्तंभ जवळील रहदारीच्या ठिकाणीच स्टेज उभारण्यात आला होता. मात्र वसई, वरई, सफाळे, मासवन, माहीम असा दौरा आटोपून उद्धव ठाकरे यांना पालघरला पोचायला उशीर झाला. त्यामुळे रात्रीचे १० वाजून गेल्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेत त्यांनी कुठलाही प्रचार न करता मी पुन्हा येईन असे कार्यकर्त्यांना सांगून ते निघून गेले.
पालघरच्या हुतात्मा स्तंभ जवळच बेकायदेशीररित्या उभारलेल्या स्टेजची कुठलीही परवानगी पालघर नगर परिषदेकडे घेण्यात आलेली नव्हती तसेच त्यांचे शहरात विविध ठिकाणी लावलेली पोस्टर्सची परवानगीही ही घेण्यात न आल्याने सेना शहर प्रमुख भुषण संखे, मे. भाविक डिजिटल पालघर, मे.एस.एम.अॅडव्हर्टायजिंग अॅण्ड मार्केटिंग, बोरीवली, मुंबई यांनी आदर्श आचारसंहितेतील नियमानुसार भंग केला आहे. त्यांच्या विरूद्ध पालघर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद आहे.विनापरवाना हुतात्मा स्तंभ जवळच उभारलेल्या स्टेजची कुठलीही परवानगी पालघर नगर परिषदेकडे घेण्यात आलेली नव्हती तसेच, विविध ठिकाणी लावलेली पोस्टर्सची परवानगीही ही घेण्यात न आल्याने मालमत्ता विदृपीकरण प्रतिबंध अधिनियमातर्गत कारवाई करण्यात आली.वसई-विरारमध्ये बॅनरबाजी तक्रारींकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षच्विरार : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता सर्वत्र लघु करण्यात आली आहे. तरी देखील वसई विरारमध्ये काही ठिकाणी राजकीय पक्षांचे बॅनर लावलेले दिसून येत आहेत. तसेच, पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आचार संहितेचे उलंघन होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.च्लोकसभेच्या निवडणुका टप्प्या टप्प्यात होणार असून आचारसंहितेच्या कळत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा राजकीय पक्षांना त्रास दायी ठरू शकतो. हे माहित असताना देखील नालासोपारा व विरार पूर्वेला काही ठिकाणी आचार संहितेचे उलंघन होत आहे. याकडे लक्ष वेधले आहे.च्आचारसंहिता लागल्या नंतर सर्व राजकीय पक्षांनी आप आपले बॅनर काढून टाकले व भिंतीवर असलेल्या त्यांच्या जाहिरातींचे चित्र देखील मिटवले. रोज या बाबत कारवाई होत असली तरी यावर तोस कारवाई करून गुन्हा दाखल केला जात नाही आहे. यामुळे राजकीय पक्षांचे फावले आहे.च्फक्त प्रचाराचे नाही तर अभिनंदन व शुभेच्छा देण्याकरीता देखील फलक लावले जात आहे. वसई विरार शहरात अनेक ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर जैसे थे असून काही ठिकाणी तर पक्षाच्या कार्यालयावरील, नगरसेवकाच्या कार्यालयावरील बॅनर पण जसे होते तसेच आहेत.च्या प्रकरणी महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे यांनी ‘‘महापालिकेचे लक्ष असून काही ठिकाणी चौकशी करायची राहिली असेल.’’ असे सांगितले. तर उपायुक्त रमेश मनाळे यांनी कारवार्स सुरु असुन पहिल्यांना ताकीद दिली जाते. मात्र, नंतर नक्कीच गुन्हे दाखल होतात असे सांगितले.