अनिरुद्ध पाटील
बोर्डी : हुडहुडी भरवणाºया थंडीला प्रारंभ झाला असून त्यासह शेत-शिवारात पोपटीच्या पार्ट्याही जोमाने सुरू झाल्या आहेत. स्थानिकांप्रमाणेच मुंबई उपनगरात नोकरीनिमित्त वास्तव्याला गेलेले सुद्धा या चवीच्या ओढीने गावाकडे येऊन यथेच्छ आस्वाद लुटताना दिसतात.
प्रत्येक मौसमात विशिष्ट खाद्यसंस्कृती हे ग्रामीण भागातील महत्वाचे वैशिष्ठ आहे. थंडीच्या हंगामात उत्तर कोकणात पोपटीच्या पार्ट्या विशेष प्रसिद्ध आहेत. वालाच्या शेंगा, त्यामध्ये हरभरा, मटार, बटाटा, वांगी, गोड कंद, रताळी आणि मीठ अशा जिनसा एकत्र मटक्यात घातल्या जातात. त्यानंतर मटक्याचं तोंड विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीने बंद करून जमिनीवर पालथं घातल्यावर गवताचे आच्छादन टाकून आग पेटवली जाते.साधारणत: २० ते २५ मिनिटं जाळ पेटवला जातो. त्यानंतर २५ ते ३० मिनिटांनी मटकं थंड झाल्यावर हे पदार्थ बाहेर काढून खाल्ले जातात. काहीजण आवडीनुसार फक्त वालाच्या शेंगांच वापरतात. या मध्ये आवडीनुसार चिकनही घातले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोपटीच्या पार्ट्यांना सुरु वात झाली आहे.सीमाभागात उबेड्यू संबोधनच्सीमा भागातील गावांमध्ये पोपटीला उबेडयू म्हंटले जाते. हा गुजराती शब्द असून माठ उपडे करून हा पदार्थ बनविला जात असल्याने हे नाव प्राप्त झाले आहे. फक्त वालाच्या शेंगा घालून, सर्व प्रकारच्या शेंगा आणि कंद घालून तसेच सोबत चिकन घालूनही उकडहंडी बनविली जाते.च्स्थानिक पातळीवर आयोजित चिकू आणि अन्य प्रकारच्या महोत्सवांमध्ये पोपटीचे स्टॉल चांगलीच गर्दी जमावतात. याठिकाणी प्रत्यक्ष उकडहंडी बनवताना पाहण्याची संधी उपलब्ध होते. पारंपरिक ग्रामीण खाद्य संस्कृती टिकविणे आणि त्याला ग्लोबल टच देणे हा त्यामागचा उद्देश आहे.