लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापुर एमआयडीसी मधील सम्प नं ३ मध्ये चारशे मेट्रिक टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून, पावसाळ्या पूर्वी विल्हेवाट न लावल्यास प्रदूषणाची गंभीर समस्या हे ३० मे रोजी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ता नंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्लज विल्हेवाटीचे एमआयडीसीला दिलेले आदेश व इतर दाखल असलेल्या दाव्याची दखल घेवून पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक व रासायनिक कारखान्यांच्या तपासणीसाठी समितीची स्थापना पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे राष्ट्रीय हरित लवादाच्या ३० मेच्या आदेशा बरोबरच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांचे कडील दावा व प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे, यांचे कडील २९ एप्रिल २०१७ रोजीच्या अहवालानंतर पालघर जिल्ह्यात धोकादायक व रासायनिक कारखान्यामुळे पर्यावरणास मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाल्याने पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.समितीच्या अध्यक्षपदावर पालघर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली असून सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई, कामगार उपायुक्त, पालघर, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर- १, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, प्राचार्य, सेंट जॉन कॉलेज पालघर, हे सर्व समितीचे सदस्य तर उपविभागीय अधिकारी पालघर विभाग, पालघर हे सदस्य सचिव म्हणून असणार आहेत समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा आयोजित करण्यात येवून तिचा अहवाल जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर होणार आहे. पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक कारखाने व रासायनिक कारखाने यांची तपासणी करीता सदर समिती जिल्ह्यातील धोकादायक व रासायनिक कारखान्यांची यादी सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई यांचेकडून प्राप्त करून घेईल. त्याच प्रमाणे या तपासणी करणेसाठी सह. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, वसई , कामगार उपायुक्त, पालघर व उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर -१ यांचेकडून माहिती प्राप्त करून सर्वंकष तपासणीचा नमुना तयार करणार आहे.या कामा करीता पथकाची उभारणी करण्यात येणार आहे. तपासणी झाल्या नंतर तात्काळ कार्यवाही करणेबाबत जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांना आदेश दिले जाणार आहेत.
रासायनिक कारखान्यांवर समितीचा वॉच
By admin | Published: July 03, 2017 5:57 AM