शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

सामान्य माणूसच विकासाचा केंद्रबिंदू - पालकमंत्री विष्णू सवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 1:22 AM

जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी येथे केले.

पालघर  - जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी येथे केले.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनिदनानिमित्त पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणकरण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष-निलेश गंधे, खासदार राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षकगौरव सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर आदी मान्यवरांसह स्वातंत्र्य सैनिक विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सवरा म्हणाले, चार वर्षांच्या कालावधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनासह मी व्यक्तीश: प्रयत्नशील आहे. सिडको च्या मदतीने पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालय नजिकच्या काळातउभे राहणार आहे. हे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्या बरोबरच पालघर शहराच्या शाश्वत व नियोजनबद्ध विकासावरही भर दिला जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या योजनांचीप्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.विक्रमगडमध्ये रँलीविक्रमगड : स्वतंत्र दिनानिमित्त येथील आंलोडा, वेहलपाडा, सवादे ,साखरे अशा ठिकाणी भाजपा कडून झेंडावंदन करण्यात आला. व या विविध ठिकाणी जेष्ठ नागरिकच्या सत्कार करण्यात आला. यावेळी आलोंडा ते विक्रमगड व विक्रमगड ते साखरे मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांनी देशभक्तीचा संदेश देणारे संदेश देणारे बॅनर व फलके हाती घेतली होती.एनसीसीकडून सलामीबोर्डी : येथील आचार्य भिसे विद्यानागरीतील एनसीसी कॅडेट्स कडून झेंड्याला मानवंदना दिल्यानंतर प्रमुख पाहुणे दिगंबर राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीत सदस्या किरण शहा, विजयस्तंभ येथे डॉ. भरत फाटक यांनी, तर नरपडच्या अ. ज. म्हात्रे विद्यालयात शिवनाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर परिसरातील प्राथमिक शाळांनी मुख्याध्यापक तसेच ग्रामपंचायत व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आशागड येथील कॉ. शामराव परु ळेकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवीण दवणे यांनी ध्वजा रोहण करण्यात आले.वाडा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरावाडा : सकाळी शहरातून स्वामी विवेकानंद हायस्कूल, पी. जे. हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा, लिटल एंजल्स स्कूल, आदी शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती. शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्र म वाडा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार दिनेश कुºहाडे, नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.वसईच्या किल्ल्यावर झेंडावंदन !वसई : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यावर ‘आमची वसई’ सामाजिक संगठनेने बुधवारी मोठ्या उत्साहात ध्वजवंदन केले. प्रतिवर्षी केंद्रीय पुरातत्त्व विभागातर्फे वसई किल्ल्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येते. गत काही वर्षांपासून आमची वसई सामाजिक संगठनाही येथे ध्वजवंदनास उपस्थित असते.सरुपाड्याच्या अंगणवाडीत सलामीसफाळे ( सुरूपाडा ) : शक्ती संस्था आयोजित स्वातंत्र्य दिन सफाळे गावातील सुरूपाडा येथील अंगणवाडी येथे पार पाडण्यात आला.यावेळी निर्भय मित्र मंडळ, ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. यावेळी निखिल आठवले, डॉ. सुरेश खैरनार ( सेवा-दल राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. तसेच ज्योती बडेकर (वाघिणी अध्यक्ष), विद्याधर ठाकूर (सेवा-दल पालघर) स्वप्नील तरे (लोक शक्ती), सूर्यवंशी (सफाळे पोलीस दल), अनिल चौधरी, निंबकर, हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.या दिवसाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कासा भागात स्वातंत्र्य दिन साजराकासा : परिसरामध्ये स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कासा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी ध्वजारोहण केले. कासा हायस्कूलमध्ये शाळेचे पर्यवेक्षक अरु ण खंबायत यांच्या हस्ते झेंडावंदन केले आणि कासा ग्रामपंचायतमध्ये सरपंच रघुनाथ गायकवाड यांनी ध्वजारोहण केले.मनोर परिसरात विविध कर्यक्र ममनोर : स्वतंत्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर,स्वछता अभियान असे विविध कार्यक्र म मनोर टेन परिसरात घेण्यात आले. तब्बल १२० ठिकाणी राष्टÑध्वजाला सलामी देण्यात आली. टेन जि. प. मराठी व उर्दू शाळेतील विध्यार्थ्यांनी टेनगाव ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत तसेच मनोर हायस्कुल, अली अल्लाना, मराठी-उर्दू शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशभक्तीचा संदेश दिला.परूळेकर कॉलेजमध्ये ध्वजारोहणडहाणू : तालुक्यातील आशागड येथील काँ. शामराव परूळेकर कनिष्ठ महाविद्यालयात स्वातत्रिदनानिमित्त आयोजित कार्यक्र मात विद्यार्थ्यांना ज्येष्ठ पत्रकार प्रविण दवण यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डहाणूतील दानशूर मीनू इराणी, मनी टिचर, तलासरीतील गोदुताई परु ळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपूत, आदिवासी प्रगती मंडळाचे संचालक धनगर,परूळेकर शिक्षण समिती अध्यक्ष दिनेश कर्नावट, लायन्स क्लब आँफ डहाणूचे अध्यक्ष जिग्नेश ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.वसईत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरापारोळ : वसईमध्ये स्वातत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अनेक शाळामध्ये प्रभात फेरी तसेच सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन केले होते. या भागात पोलीस ठाणे, वनविभाग, वनविकास, प्राथमिक आरोग्य केंद्र, व इतर शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तर काही शाळा मध्ये सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यात तहसील कार्यालयात झेंडावंदनविकमगड : येथील तहसीलदार कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनी तहसीलदार श्रीधर गिलीपिले याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्र मास शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलिस व इतर शासकीय अधिकारी, विद्यार्थी, नगरसेवक, नगराध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते .बोईसर-तारापूर परिसरात प्रभातफेºयातारापूर : बोईसरच्या परिसरातील सर्व ग्रामपंचायती, शाळा व महाविद्यालयात,पोलीस स्थानक आणि काही शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभातफेºया काढल्या होत्या. ठीकठिकाणच्या सरपंचांनी तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.महापौरांच्या हस्ते ध्वजारोहणवसई विरार शहर महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर रु पेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पालिका आयुक्त सतीश लोखंडे , माजी महापौर प्रविणा ठाकूर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अग्निशमन प्रमुख दिलीप पालव, माजी महापौर राजीव पाटील, माजी स्थायी सभापती अजीव पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.तहसीलदारांकडून मानवंदनावसई उपविभागाच्यावतीने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्या हस्ते वसई तहसीलच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvishnu savaraविष्णू सावरा