- हितेन नाईकपालघर - जि.प.मध्ये अनुकंपा बोगस भरतीत झालेल्या गैरप्रकरणी फक्त लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांना जबाबदार धरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचिवण्याच्या विरोधात माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे येत्या आॅक्टोबर महिन्यात या प्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करण्यास सुरु वात झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सर्वसाधारण सभेत बुधवारी जाहीर केले.पालघर जिल्हा निर्मिती नंतर ठाणे जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीच्या यादी मधील २८ कर्मचाºयांच्या नेमणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये पालघर जिल्हा परिषदे कडून घाईघाईने करण्यात आल्याचे निदर्शनास येताना ठाणे जिल्हापरिषदेने मात्र अनुकंपा तत्वाच्या भरती करणे टाळले होते. दि.२१ फेब्रुवारी २०१७ ला या भरतीचा आदेश काढताना ज्या मंजूर टिपणीचा संदर्भ देण्यात आला त्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यकार्यकरी अधिकारी यांची स्वाक्षरीच नसल्याने फक्त संबंधित विभागातील लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक यांनीच हा भरतीचा निर्णय घेतल्याचे भासवीत उच्चपदस्थ अधिकाºयांना वाचिवण्याचा डाव खेळला जात होता.या भरतीद्वारे २८ कर्मचाºयांच्या नेमणुका करताना मोठा गैरव्यवहार झाल्याची बाब पाटील यांनी प्रथम सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आणली होती. त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी स्वत: चौकशी केली होती. परंतु कारवाईचे सत्र पुढे सरकले जात नसल्याने पुन्हा १२ जून च्या सर्वसाधारण सभेत हा विषय गाजला. त्यामुळे प्रकल्प संचालक माणिक दिवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांची एक चौकशी समिती नेमण्यास शासनाला भाग पडले होते.परंतु या गैरव्यवहाराचा अहवाल मात्र सादर केला जात नव्हता. दरम्यानच्या काळात निधी चौधरी यांची बदली मुंबई महानगर पालिकेत आणि या प्रकरणातील संशयाच्या घेºयात सापडलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांची बदली (अजूनही त्यांना नेमणूक दिलेली नाही) करण्यात आली होती.बुधवारच्या सर्वसाधारण सभेत या अहवालाचे वाचन होत सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याचा ठराव पारित होईल अशी अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या बाबत ठोस भूमिका घेतली जात नसल्याने उपस्थित पदाधिकारी, सदस्यांनी आक्र मक भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनाला नमते घेत पुढच्या महिन्यापासून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिल्या नंतर सर्वसाधारण सभेतील वादळ काही अंशी शमले.अनुकंपा भरती प्रक्रि या पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी मी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या कडे एक समिती नेमण्याबाबत सांगितले असता त्यांनी ऐकले नव्हते.- सुरेखा थेतले,माजी अध्यक्षा, जि. प. पालघरया भरती प्रक्रि येतील गैरव्यवहाराला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि उप मुख्यकार्यकारी प्रकाश देवऋषी जबाबदार असून जो पर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत मी गप्प बसणार नाही.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष
अनुकंपा भरती गैरव्यवहारातील दोषींवर दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 6:31 AM