- हुसेन मेमनजव्हार - ट्विंकल, समृध्दी व आता कालकम नामक संस्थांनेही आपले हात वर करत ठेवीदारांचे पैसे मुदत पुर्ण झाल्यानंतरही परत देण्यास नकार दिला आहे. या वित्तसंस्था दिवाळखोरीच्या मार्गावर असून येथील काही ग्राहकांनी कालकम बँके विरूध्दात जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.तालुक्यात खेडोपाड्यातील आदिवासी समाजाच्या गरीब लोकांना पैसे दुप्पट करुन देण्याच्या आमिषाने ३ वर्षे ते ५ वर्षे मुदत ठेवीत लाखो रूपये ठेवीच्या रूपात पैसे उकळण्याचे काम सोनार आळी येथील कालकम बॅँके मार्फत आले जात होते. मात्र, आता ट्विंकल व समृध्दी जीवन सारख्या योजनाद्वारे कालकम ने ठेवीदारांना फसवले असल्याचे आरोप होत आहेत. काही ग्राहकांच्या ठेवींना मुदत पुर्ण होऊन वर्ष तर काहींना ४ ते ५ महिने उलटले आहेत. मात्र, बॅँकेकडून परतावा मिळत नसल्याने ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत.सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत ग्राहक बॅकें बाहेर चकरा मारत असून तेथे शिपाया खेरीज कुणीही उपस्थित नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. शिपायाकडून एकच उत्तर मिळते की, तो फक्त एकच उत्तर देतो, मॅनेजर नाहीत. त्यामुळे ग्राहकवर्गाकडून कारवाईची मागणी होत आहे.आम्ही आमचे मुदत ठेवीचे पैसे मुदत पुर्ण झाल्यानंतर घेण्यासाठी आलो मात्र, आम्हाला पुढच्या महिन्यात देऊ, नंतर देऊ असे उडवा उडवीचे उत्तर दिली. आज मला मुदत संपुन ४ महिने पुर्ण झाले तरी मला रक्कम मिळालेली नाही.-सुरेश पानगा, ग्राहक, पवारपाडामी गरीब घराची असून एजन्टने गोडी गुलाबीने आमच्या कडून तीन वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देऊ असे सांगून आमचे कष्टाचे पैसे घेतले. मात्र, आज आम्ही आमचे पैसे मागायला आलो तर बॅँक पैसे देत नाही, आमच्यावर तर उपासमाराची वेळ आली आहे.-मिरा वाघ, पिडीत ग्राहक, वाकीजव्हारच्या टीडीसी बँकेचे इंटरनेटअभावी व्यवहार ठप्पजव्हार शहरातील ठाणे मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट बंद असल्याने, ग्रामीण भागातील गरीब ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. टीडीसी बँकेच्या बाहेर बँकेतील व्यवहार कधी चालू होतील म्हणून बँकेबाहेर दिवसभर पाण्या पावसात वाट पाहून ते घरी परतत आहेत. अनेकांचे व्यवहार थकल्याने नैराश्य आले आहे.शेतकरी वर्गाने घेतलेले पीक कर्ज फेडण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शिक्षकांना पगारासाठी याच बॅँकेचा आधार आहे. इंटरनेट आभावी बँक गेल्या पाच दिवसांपासून सतत बंद असल्याने सर्वांचे चांगलेच हाल झाले आहेत. विशेष करून जव्हारच्या टीडीसी बँकेत तहसीलदार कार्यालयाकडून वयोवृद्ध नागरिक, निराधार महिला, जेष्ट नागरिक तसेच पेशंनधारक नागरिकांना यांना पैसे मिळतात.हे ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला आपला नंबर लावण्यासाठी सकाळीच येऊन बसतात. मात्र, व्यवहार बंद असल्याने वाट पाहून निराश होवून परत जातात. याबाबत टीडीसी बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, आमची बीएसएनएल लाईन बंद झाली आहे. त्यामुळे नाईलाज आहे असे मोघम उत्तर दिले जाते.
कालकम बॅँकेविरोधात फसवणुकीची तक्रार, ग्राहकांचे मुदतठेवीनंतरही पैसे मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 2:51 AM