पालघर/मनोर : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मनोर पोलिसांनी परिसरातील आश्रमशाळा व विद्यालयांच्या बाहेर शुक्रवारी तक्रारपेट्या लावल्या असून विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी या पेट्यांच्या माध्यमातून कळविण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्र म मनोर पोलीस ठाण्याचे सहायक पो.नि. मनोज चाळके व रतीस पाटील दानशूर यांनी सुरू केला आहे.आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शाळा-विद्यालयांमध्ये मुलींवर नेहमी अन्याय-अत्याचार होत असतात. त्या याबाबत तक्रार करण्यासाठी किंवा आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी घाबरतात. हे लक्षात घेऊन चाळके यांनी त्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम स्वत: सांगितला. तक्र ार करण्यासाठी मनोर, एमबुर, गोवाडे, भोपोली, खुंटल, टाकव्हल, आश्रमशाळा तसेच लालबहादूर शास्त्री हायस्कूल चाफेकर विद्यालयामध्ये या पेट्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक व अधीक्षक उपस्थित होते. सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटी सदस्य, दानशूर पाटील, उपसरपंच साजिद खतीब उपस्थित होते. (वार्ताहर)
शाळा, वसतिगृहांच्या दारांत तक्रारपेट्या
By admin | Published: October 15, 2016 6:31 AM