पालघर : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परस्पर एकतर्फी केलेली पगारवाढ अमान्य करीत पालघर विभागातील 8 आगारा पैकी 5 आगारातील चालक-वाहकांनी शुक्र वारी मध्यरात्री पासून उत्स्फूर्तपणे बंद आंदोलन सुरु केले. एकूण 593 फेर्या पैकी 295 एसटी फेर्या रद्द झाल्याने ह्या विभागातुन दररोज प्रवास करणार्या लाखो प्रवाशांचे हाल झाले.शुक्रवारी मध्यरात्री पासून राज्यभरातील परिवहन विभागासह पालघर विभागातील पालघर, सफाळे,बोईसर, डहाणू, जव्हार,वसई, अर्नाळा आणि नालासोपारा ह्या आठ आगरापैकी पालघर, बोईसर, डहाणू, वसई आणि नालासोपारा ह्या पाच आगारातील एसटी विस्कळीत झाली.पालघर विभागांतर्गत 8 आगरातून दररोज 2 लाख 50 हजार प्रवासी प्रवास करीत असून 2 हजार 686 फेर्या द्वारे 1 लाख 30 हजार किलोमीटर्स चा पल्ला गाठला जातो. पालघर आगराला रोजचे 43 लाखाचे उत्पन्न मिळते.शुक्र वारी बंद जाहीर करण्यात आल्या नंतर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनांसह अन्य 22 संघटनांच्या कर्मचाº्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने पालघर विभागातील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यावेळी परिवहन विभागाने नव्याने भरती झालेल्या चालक, वाहक ह्यांना बंद मध्ये सहभागी झाल्यास नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल अशा सक्त ताकीद दिल्याने काही आगारातील कनिष्ठ कामगार कामावर उपस्थित झाले. त्यामुळे पालघर, डहाणू, वसई, नालासोपारा आदी आगरातून काही एसटी बसेस मार्गस्थ झाल्या.पहाटे पासूनच मुंबई-गुजरात च्या दिशेने जाणारे चाकरमानी,मासे विक्रेत्या, भाजीपाला विक्र ेत्या,दूध विक्र ेत्या, महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी आदी अनेक छोट्या-मोठ्यांना ह्या बंदचा मोठा फटका बसला
पालघर जिल्ह्यात एस.टी.संपाला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:41 AM