हितेन नाईक पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर, काँग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्यासह अन्य तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. काँग्रेसवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आल्याने, जिल्ह्यातील त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर घेतलेल्या पोटनिवडणुकीत, भाजपाकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून किरण गहला, तर अपक्ष शंकर बदाडे, संदीप जाधव असे सात उमेदवार रिंगणात होते. पालघर, बोईसर, विक्र मगड, डहाणू, नालासोपारा आणि वसई या सहा विधानसभा क्षेत्रात ८ लाख ८६ हजार ८७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वैध झालेली ८ लाख ६९ हजार ९८५ मतांच्या (नोटा मते वगळून) आधारे, १ लाख ४४ हजार ९९८ मते आपले डिपॉझिट वाचविण्यासाठी मिळविणे गरजेचे असताना ती त्यांना न मिळाल्याने, काँग्रेसचे दामोदर शिंगडा, माकपचे किरण गहला, दोन अपक्ष शंकर बदाडे, संदीप जाधव या चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे सहायक निवडणूक अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.
कॉँग्रेससह तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:11 AM