हितेंन नाईक
पालघर : ‘वायू’ चक्रीवादळाच्या फटकाºयाने निर्माण झालेल्या महाकाय लाटांनी रौद्ररूप धारण करीत सातपाटी गावाचा धूप प्रतिबंधक बंधारा ओलांडायला सुरुवात केल्याने किनाºयावर राहणाºया लोकांच्या मनात धडकी भरायला सुरुवात झाली आहे.
सातपाटीच्या पश्चिमेकडील समुद्रातून निर्माण झालेल्या लाटा किनाºयावरील घरांना धडकू लागल्यानंतर किनाºयालगत २०१२ मध्ये १५०० मीटर्स बंधारा बांधण्यात आला होता. कालपरत्वे या बंधाºयातील दगड लाटांच्या माऱ्यांनी उखडून निघून बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे या बंधाºयाला ठिकठिकाणी भगदाडे पडून मागील अनेक वर्षांपासून गावात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीनी नव्याने बंधारा बांधण्याच्या मागणीवरून सातपाटी येथे नव्याने ४२५ मीटरचा बंधारा मंजूर झाला होता. परंतु हा बंधारा हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेमुळे आणि सीआरझेडच्या कचाट्यात सापडला होता.मागील दोन वर्षांपासून सातपाटीमधील घरात समुद्राचे पाणी शिरू लागल्याने शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या शिरलेल्या पाण्यामुळे गावातील घरांना मोठा धोका निर्माण झाल्याने खासदार राजेंद्र गविताच्या प्रयत्नासह ग्रामपंचायत, सहकारी संस्थानी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. लोकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाल्याने न्यायालयाने या बंधाºयाच्या बांधणी संदर्भात काही नियमावलीत शिथिलता आणण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाºयांनी राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ मधील ३० (२) व कलम ७२ मधील तरतुदींच्या त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत बंधाºयाच्या पुनर्बांधणीचे आदेश काढण्यात यश मिळविले.समुद्राच्या महाकाय लाटांचा मारा सहन करता यावा यासाठी बंधाºयांत सुमारे ५०० ते १००० किलोचे दगड वापरण्यात येत असल्याचेही पतन विभागाचे सहाय्यक अभियंता एन.यु.चौरे यांनी सांगितले. सध्या ५०० मीटर्सच्या बंधाºयाचे काम पूर्ण होत असून फोकलँडच्या सहाय्याने इतरत्र विखुरलेले दगड बंधाºयाला पडलेल्या भगदाडात टाकून गावात शिरणारे समुद्राचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.८० मीटर लांबीच्या वाढीव बंधाºयाला मान्यतासध्या ४२० मीटर लांबीच्या आणि ५ कोटी किमतीच्या बंधाºयाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने त्याचे काम सुरू असून अन्य १ कोटी किमतीच्या आणि ८० मीटर लांबीच्या वाढीव बंधाºयालाही मान्यता मिळाल्याची माहिती पतन विभागाचे सहाय्यक अभियंता एन.यु.चौरे यांनी लोकमतला सांगितले. एकूण १ हजार ३०० मीटर्सच्या बंधाºयांची मागणी करण्यात आली असून समुद्रसपाटीपासून ८ मीटर्सची उंची राहणार आहे.