शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ संविधान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:02 AM

हजारो नागरिकांचा सहभाग

पालघर : राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मूक मोर्चा काढण्यात आल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात सोमवारी संविधान सन्मान मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येऊन नागरिकत्व संशोधन अधिनियमाला पाठिंबा दर्शवत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या वेळी ‘हल्ला बोल हल्ला बोल, नक्षलवाद पे हल्ला बोल, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत सन्मान संविधान मंचच्या वतीने पालघर सर्कस ग्राउंडमधून हजारोंच्या संख्येने निघालेल्या नागरिकांनी शहर दणाणून सोडले. या वेळी शहरातील बहुतांशी दुकाने बंद होती.या वेळी भाजपाचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सुधीर दांडेकर, उमेश गायकवाड, या संतोष जनाठे, बाबा कदम, मुकेश दुबे, नगरसेवक भावानंद संखे, अरुण माने, लक्ष्मीदेवी हजारी, भाजप जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, अरुण जैन आदी या रॅलीमध्ये उपस्थित होते. जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी न्या कायद्याला पाठिंबा दर्शविला. देशासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या आणि लोकसभा व राज्यसभा यांनी पारित केलेल्या व राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी दिलेल्या कायद्याचे आम्ही समर्थन करतो, असा जयघोष रॅलीमध्ये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे कलम ५१ ए नुसार संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था यांचा आदर करणे प्रत्येक भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे. संविधानाद्वारे स्थापित, संसदेने पारित केलेल्या सीएए कायद्याचे हिंसक विरोध करून पोलीस व प्रशासनावर दगडफेक करून सार्वजनिक संपत्ती नष्ट करणे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे या रॅलीत सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यात या कायद्याची त्वरित अंमलबजावणी करून घुसखोरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या रॅलीत करण्यात आली.प्रवाशांचे हालसकाळी १० वाजता रॅली निघणार असल्याने पालघर स्थानकातील एसटी बसेस, सहा आसनी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबई, गुजरात दिशेने जाणाऱ्या व येणाºया प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गावागावात रिक्षा व एसटीची वाट पाहत अनेक प्रवासी उभे होते. तर मुंबईवरून आलेल्या काही प्रवाशांना चालत थेट आपले केळवे गाव गाठावे लागले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक