शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

वाकी, सारशी, ग्रा.पं.च्या नवीन कार्यालयांचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:09 PM

जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष; जनसुविधा योजनेतील निधी मिळेना

विक्रमगड : ग्रामीण भागातील विकासकामे करण्यासाठी जनसुविधा योजनेची सुरूवात केली. मात्र याच जनसुविधा योजनेतून वाकी आणि सारशी या ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयांचे बांधकाम निधीअभावी अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. या बांधकामासाठी २०१३ - १४ या आर्थिक वर्षात १३ लाख ५३ हजार ३३६ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यातील सव्वा तीन लाखांचा पहिला टप्पाच देण्यात आला.यात वाकी ग्रामपंचायतीने १३ व्या वित्त आयोगातील साडे तीन लाख एवढी रक्कम सहभाग म्हणून टाकून नवीन इमारत बांधकामासाठी एकूण ६ लाख ७५ हजार खर्च करण्यात आला. तर सारशी ग्रामपंचायतीला ३ लाख २५ हजार देण्यात आले. यातच पायाभरणी, कॉलम भरणे, भिंतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम सहा वर्षे होऊनही शासनाने ग्रामपंचायतींना वर्ग न केल्याने या इमारती अपूर्ण अवस्थेत आहेत.जनसुविधा योजनेतील उर्वरित निधी न मिळाल्याने वाकी तसेच सारशी या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. पुढील निधी मिळावा यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे.वाकी ग्रामपंचायत नवीन कार्यालय बांधकाम निधी अभावी रखडले आहे. केलेल्या बांधकामचे मूल्यांकन करण्यात आले असून पुढील निधी शासनाने दिल्यास ग्रामपंचायती रखडलेल्या नवीन कार्यालयांची बांधकामे करतील.- मनोज अंबोरे (शाखा अभियंता, पं.स.विक्र मगड)माझी वाकी ग्रामदान मंडळमध्ये नुकतीच अध्यक्ष (सरपंच) पदी निवड झाली असून, या नवीन कार्यालय इमारतीचे बांधकामाबाबत चौकशी केली असता शासनाने उर्वरित निधी न दिल्याने ही कार्यालये अपूर्ण अवस्थेत आहेत. पुढील निधी शासनाकडून मिळावा, यासाठी पत्रव्यवहार करून परत मागणी करू. - नरेंद्र भडांगे, अध्यक्ष, सरपंचग्रामदान मंडळ वाकीशासनाने जन सुविधा योजनेतून वाकी, सारशी या ग्रामपंचायतींना नवीन कार्यालये बांधकामांना मंजुरी दिली. पण केवळ सव्वा तीन लाख दिले. उर्वरित निधी न दिल्याने कामे अपूर्ण आहेत. यामुळे जनसुविधा योजनेचा शासनानेच बोजवारा उडवल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उर्वरित निधी उपलब्ध करून द्यावा.-रमेश कुºहाडा, माजी उप सभापती,पंचायत समिती विक्र मगड