शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महावितरणच्या वाढीव विजबिलांमुळे ग्राहक कमालीचे हैराण; कार्यालयाबाहेर तक्रारींसाठी तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 5:16 PM

-आशिष राणे वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता   महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग ...

-आशिष राणे

वसई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता  महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीज देयके देण्यात आली आहेत. मात्र ही देण्यात आलेली वीज देयके अवास्तव वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतच्या तक्रारी साठी वसईत विविध वीज  कार्यालयांत ग्राहकांची तोबा गर्दी व मोठ्याला रांगा लागल्या आहेत.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती.टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने ती अवास्तव वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी महावितरण ला केल्या आहेत.

मागील तीन दिवस झाले वसई तालुक्यातील सर्वच भागातील विज कार्यालयाच्या ठिकाणी वीज देयके कमी करण्यासाठी व त्याबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचं चित्र सर्वत्र दिसते आहे, जरी महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे.  तर आधीच टाळेबंदीत हाताला काम नाही अशामध्ये हजारोंच्या फरकाने आलेली वीज देयके कशी भरायची असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात  आहे.

एप्रिल पासूनची वीज देयके ही एम.ई.आर.सी. यांच्या निर्देशानुसार जानेवारी ते मार्च या महिन्यांचे सरासरी वापराचे युनिट काढून ग्राहकांना देयके दिली आहेत.  त्यामुळे देण्यात आलेली वीज देयके ही अचूक असल्याचे महावितरणतर्फे प्रभारी  वसई अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

याउलट अधिक माहिती देताना अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांना वीजदेयके जास्त आल्याचे वाटत असेल त्यांनाही महावितरणच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत वीज देयक कसे दिले आहे याची माहिती दिली जात आहे.तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून वीज न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर काढून घेण्यात आलेले नाही तरीही ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून केले जात असल्याचे प्रभारी अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांनी केले आहे.

ग्राहकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका !

वीज देयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयात फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. आधीच वसई विरार शहरात करोना प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे त्यातच आता ग्राहकांना वीज बिल भरमसाट आल्याने कमी करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टाळेबंदी असल्याने कोणत्याही वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेण्यात आले नसल्याने ग्राहकांना सरासरी वीज देयके काढण्यात आली आहेत. जून महिन्यापासून मीटर घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील.

– मंदार अत्रे, अधीक्षक, (प्रभारी) अभियंता महावितरण वसई

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजVasai Virarवसई विरार