विरार : कुर्ला स्थानकावर घडलेल्या घटनेनंतर शीतपेय विक्रेत्यांवर कारवाई करण्याची पालिकेतर्फे ठरवण्यात आले होते. तर यासाठी आरोग्य विभागातर्फे खास पथक देखील नेमण्यात येणार होता. परंतू, आयुक्तांकडे वेळ नसल्याने ते पथक अद्यापही नेमण्यात आलेले नाही. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे.
कुर्ला स्थानकावर शितपेय विक्र ेता अस्वच्छ शीतपेय विकत असल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत सज्ज झाले होते. महापालिकेतर्फे शीतपेय विक्र ेत्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होते. वसई-विरार पालिकेतर्फे या कारवाईकरीता खास पथक नेमण्यात येणार होते. तसेच हे पथक आयुक्तांकडून नेमण्यात येणार होते. या कामासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, ही संपूर्ण प्रक्रि या कागदावरच राहिली आहे.
मार्च महिन्यापासून हे पथक नेमण्याचा ठराव झाला होता. मात्र, आता मे महिना संपत आला तरी अजूनही पथक नेमण्यात आले नाही. उन्हाळ्यात शीतपेयाला जास्त मागणी असते. त्यामुळे याच वेळेत शीतपेय विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, आयुक्तांना वेळ नसल्याने निवडणुकांची कारणे देत त्यांनी पथक स्थापन केले नाही आहे.आयुक्तांची पाठपथक अजूनही स्थापन झालेले नाही, परंतु येत्या पाच सहा दिवसात होईल अशी माहिती आयुक्त, बी.जी.पवार यांनी असे म्हटले आहे.आयुक्त कारणे देऊन पथक स्थापन करण्याचे टाळत असल्याने वसईकरांचे आरोग्य संकटात आले असून ही दिरंगाई जीवावर बेतु शकते.