शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

रोडची चाळण तरीही ठेकेदारांची बिले काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 3:13 AM

भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यामधील भ्रष्टाचार : सुप्रीमनंतर शिवशाहीनेही केले उखळ पांढरे

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात पडलेले खड्डे भरण्याच्या कामात ठेकेदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोंचा गैरव्यवहार केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी भिवंडी चे आमदार रु पेश म्हात्रे यांनी राज्याच्या मुख्य अभियंत्यांकडे एका तक्र ारीद्वारे केली आहे.

या तक्रारीत ते म्हणतात की, वाडा व भिवंडी या दोन तालुक्यांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून तो सुिप्रम कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान मोठे खड्डे आणि खचलेल्या साईट पट्ट्यांमुळे गत काही महिन्यात येथे अनेक अपघात घडलेले आहेत. या संदर्भात शासन स्तरावर अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी लेखी निवेदने, तक्र ारी आणि उपोषण करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.साबाच्या अधिकाºयांनी संगनमताने सुप्रिम कंपनीला संरक्षण देण्याचे काम केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही शासनाचे लक्ष वेधल्यानंतर संबंधित विभागाला खड्डे भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनात सुद्धा आम्ही शासनाचे लक्ष वेधल्यानंतर बांधकाम विभागाकडून त्या संबधीची ई निविदा काढण्यात आली. त्यानुसार शिवशाही कन्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने खड्डे भरण्याचे काम हाती घेतले.अंदाजपत्रकानुसार खड्डे भरण्याचे काम होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने हे फक्त कागदावरच केल्याचे दिसत आहे.त्यासंबधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती घेतली असता. खड्डे भरण्याची कामे न करता सुमारे दोन कोटी रु पयांची बिले अदा करण्यात आली आहेत. खोटी बिले ठेकेदाराने अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमतानेच काढले असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत केला असून या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या खड्डे भरण्याच्या कामाच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून ठेकेदार कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच ठेकेदाराला काम न करताच बिले अदा करणाºया अधिकाºयांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे एका तक्र ारीद्वारे केली आहे. त्याची मुख्य अभियंत्यांनी दखल घेऊन गुण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले आहेत.चौकशीचे आदेशमुख्य अभियंत्यांनी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुण नियंत्रण मंडळाला चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार यांनी लोकमतला दिली. भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी दोन कोटी २० लाख रु पयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी जूनपर्यंत भरलेल्या खड्ड्यांचे सुमारे ४० ते ४५ लाखांचे बील ठेकेदारास आदा केले असून उर्वरित रक्कम शिल्लक आहे अरविंद कापडणीस सायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा यांनी दिली आहे.वाडा भिवंडी रस्त्यावरील अपघातांची संख्या पाहता. हे प्रकरण खूपच गंभिर आहे. त्यातच ठेकेदार शिवशाही कन्ट्रक्शन यांनी खड्डे भरल्याचे कागदोपत्री दाखवून कोट्यवधीचे बिल काढले आहे. त्याची चौकशी व्हावी!- रुपेश म्हात्रे, आमदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा