सफाळे : पश्चिम भागात असलेल्या कांद्रेभुरे-सरावली परिसरातील वाहतुकीसाठी सर्वाधिक वर्दळीचा असणारा कांद्रेभुरे-माकणे रस्त्यावर मोरी उभारण्याच्या कामाला ठेकेदाराकडून दिरंगाई होत असल्याने एस.टी. सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना बसत आहे.सफाळे पश्चिम भागातील कांद्रेभुरे-सरावली या पाच कि.मी. रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असून अरुंद आणि अर्धवट रस्ता यामुळे दहा दिवसांपासून बससेवाही बंद आहे. या संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.नुकत्याच सुरू झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास होतो आहे. या भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना व येथील नागरिकांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे पालकवर्गातून संतप्त भावना उमटत आहेत.याबाबतीत मुख्यमंत्री सडक योजनेतील शाखा अभियंता जी.पी. पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता बस पूर्ववत सुरू राहील. यासाठी रस्त्यावरील अडथळे, अपूर्ण काम पूर्ण करणे आणि पर्यायी रस्त्याची व्यवस्था आदी बाबी पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रस्त्याचे काम ठेकेदाराने संथगतीने चालविले असून सध्या बारावीची परीक्षा सुरू असून दहावीच्या परीक्षेलाही सुरुवात होणार आहे. रस्ता अपूर्णावस्थेत पडून असल्याने एखादा अपघात होत विद्यार्थी जखमी झाल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?- अशोक नाईक, ग्रामपंचायत सदस्य, सरावलीकांद्रेभुरे-सरावली अरुंद रस्ता असल्यामुळे बस जाताना झाडाच्या फांद्या व पर्यायी रस्ता अरु ंद असल्याने बसची वाहतूक करणे अडचणीची ठरत आहे.- अनिल बेहरे, आगार व्यवस्थापक, सफाळ
कांद्रेभरे-सरावली रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:27 PM