शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Corona : ऑक्सिजन न मिळाल्याने 3 रुग्णांचा मृत्यू, माजी महापौरानेच सांगितली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 3:48 PM

Corona : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू : वसई तालुक्यात खळबळ

ठळक मुद्देवसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रविवारपर्यंत ५ हजार ७९२ कोरोनाचे रुग्ण असून ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. यातील काही रुग्णांना ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे.

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांसाठी संजीवनी असलेल्या गॅस ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नालासोपाऱ्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. ही बाब माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्याने वसई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रविवारपर्यंत ५ हजार ७९२ कोरोनाचे रुग्ण असून ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. यातील काही रुग्णांना ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे. पण, आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचे हाल होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. रायगड येथील जेएसडब्ल्यूचे ऑक्सिजनचे फिलिंग स्टेशन असून येथून वसई-विरार महानगरपालिकेला ऑक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो. वसई तालुक्यात गॅलेक्सी आणि स्पीड हे दोन रिफलर सेंटर आहे. सदर ऑक्सिजन गॅस वसईत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे.

मनपाकडे सध्या तीन तास पुरेल इतका ऑक्सिजन असल्याची माहिती माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या मॅसेजमधून देण्यात आली आहे. ऑक्सिजन मिळाला नाही तर कोरोना रुग्णांचे हाल होऊन जीवितहानी होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. नालासोपाऱ्याच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळपासून ऑक्सिजनमुळे तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या मृत्यूमध्ये बविआचे माजी नगरसेवक किसन मामा बंडांगळे यांचा मृत्यूही ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू