शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

फटाका व्यवसायाला कोरोनाचा फटका; ग्राहकांत ५० टक्के घट, नियमांचे पालन करूनच व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 12:13 AM

यंदा मंदीचे सावट

- वसंत भोईरवाडा : जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये घाऊक व किरकोळ विक्रेते असतानाही वाडा शहरातील स्वस्त फटाके घेण्याचा व्यापाऱ्यांचा दरवर्षी कल असल्याचे आढळून आलेले आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, कोरोना महामारीचे संकट कायम असल्याने मनात फटाके खरेदी करण्याची इच्छा असूनही ग्राहक बाहेर पडत नसल्याने या वर्षी मंदीचे सावट आहे. 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांची संख्या ५० टक्केपेक्षाही कमी आहे. वाड्याला फटाके स्वस्त मिळत असल्याने किरकोळ व घाऊक विक्रेते या ठिकाणी येऊन फटाके खरेदी करतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय येथे चालत असून वर्षभरात करोडोंची उलाढाल होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. परंतु, यंदा कोरोनामुळे पूर्ण व्यवहार ठप्प असल्याने ग्राहक कमी प्रमाणात येत असल्याने या व्यवसायालाही कोरोना महामारीचा फटका बसला आहे.

सध्या फॅन्सी ॲटमची मागणी जास्त आहे. यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाउंटन, कलरगोळी, वंडरलाइट, स्वस्तिक व्हील, लायटिंग थंडर, मल्टीशाॅट, मल्टीबार, राॅबिट डान्सिंग, पॅराशूट, कलरबाॅल, स्काय वे, हंड्रेड शाॅट आदी आकाशातील रंगीबेरंगी फटाके यांना जास्त मागणी आहे. तसेच सुतळीबाॅम्ब, जमीनचक्र, अनार, लवंगी फटाके इ. प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.रंगीत फटाके ३५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत, चक्री २२ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत, पाऊस २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत, रेडफोर्ड फटाका सात रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत, फुलबाजे रंगीबेरंगी ३५ रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत अशा किमती आहेत. येथे येणारे बहुतांश ग्राहक हे घाऊक फटाके विक्रेते आहेत. किरकोळ ग्राहक हे दिवाळी सणाच्या पाच ते सात दिवस अगोदर येऊन फटाके खरेदी करतात. या दिवसात दरवर्षी फटाक्यांची अनेक दुकाने रात्रंदिवस सुरू असतात. यंदा मात्र व्यापारी मेटाकुटीस आले आहेत.

टॅग्स :DiwaliदिवाळीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस