शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीत  277 रुग्ण कोरोनामुक्त, तर 224 नव्या बाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:10 AM

पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 5 हजार 959 वर पोहचली आहे,

वसई -विरार शहरात शनिवारी सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक असे 277 रूग्ण यांना घरी सोडण्यात आले असून ही बाब दिलासादायक ठरली आहे.तर 224 रूग्ण हे कोरोना बाधित म्हणून आढळून आले असल्याने शहरावर रूग्ण वाढीची टांगती तलवार मात्र कायम आहे.यात नालासोपारा पूर्व पश्चिम भागातील 2 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.विशेष म्हणजे त्यात जुन महिन्यातील बहुतांश रुग्ण व त्यांच्या इतरत्र रुग्णालयातील नोंदीची चौकशी वजा  फेरतपासणी केली असता त्यात तब्बल 898 रुग्णाची वाढ झाल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले असल्याने आता शहरात पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 5 हजार 959 वर पोहचली आहे,तर दिवसभरात रेकोर्ड ब्रेक असे 277 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान शनिवारी  वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 224 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.यामध्ये  वसई- 98  नायगाव - 9  वसई-विरार- 2 नालासोपारा- 76 आणि विरार-  39  तसेच एकूण 132 पुरुष व 92  महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.

तर पालिका हद्दीत शनिवारी 2  रुग्णाचा मृत्यू ! वसई -विरार मध्ये नालासोपारा पूर्व व पश्चिम भागातील 2 रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 126 इतकी झाली आहे .एकूणच शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने महाचिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक ; वसई विरार शहरात रेकॉर्ड ब्रेक 277 रूग्ण घरी परतले !वसई विरार मनपा हद्दीत शनिवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 277 रूग्ण आपापल्या घरी परतले त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2668  वर पोहचली आहे.यात अनुक्रमे वसई - 59 ,नायगाव-7  ,वसई- विरार- 4, नालासोपारा -141 आणि विरार - 66 असे एकुण 277 मुक्त रुग्ण आहेत.

आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण जून पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मनपा व मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल रूग्ण व त्यांच्या नोंदी पालिकेत झाल्या नव्हत्या, त्यानंतर चौकशी व सर्वेक्षण करून फेरतपासणी करण्यात आली असता शनिवार दि,4 जुलै च्या आकडेवारी मध्ये एकूण 898 रूग्ण नोंदी पालिकेच्या आरोग्य विभागाने एकूण नोंदीत समाविष्ट केल्याचे स्पष्टीकरण स्वतः आयुक्त गंगाथरन डी यांनी लोकमत शी बोलताना दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार