वसई -विरार शहरात मंगळवारी 3 नविन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यात विरार पश्चिमेतील कोरोना बाधीत 42 वर्षीय तरुणाचा मात्र मुंबईत उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली.दरम्यान सोमवारपर्यँत वसई विरार शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 88 होती. मात्र मंगळवारी ही संख्या 91वर पोहचली असून यामध्ये आजवर वसई विरार शहरात 16 जण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,वसई पश्चिम येथील कोरोना बाधीत 25 वर्षीय मयत रुग्णाच्या त्या पत्नी असून महापालिकेने त्यांना इन्स्टीट्यूशनल क्वारंटीन केले होते. मात्र त्या कोविड पॉसिटीव्ह आढळून आल्या तर विरार पश्चिमेतील 29 वर्षीय हा पुरुष रुग्ण असून तो व्हिडिओजर्नालिस्ट आहे. त्याची मुंबई महापालिके मार्फत नुकतीच कोविड टेस्ट केली होती. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाला. त्याचबरोबर विरार पश्चिमेतील आगाशी परिसरातील 41वर्षीय पुरुष हा रुग्ण मिरा भायंदर येथील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असुन तो कोविड वॉर्ड मध्ये आपली सेवा देत होता. मात्र तो ही पॉझिटिव्ह आढळून आला या सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरारमधील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू विरार पश्चिमेकडील 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून हा रुग्ण मुंबई सांताकृझ येथे स्टॉक ब्रोकींग कंपनी मध्ये नोकरिला होता. मात्र दरम्यानच्या काळात त्याच्याच कार्यालयातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती मात्र त्याची लागण होऊन तो ही पॉझिटिव्ह झाला अखेर उपचारा दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.