शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Coronavirus : परदेशातून आलेल्या चौघांना कोरोनाच्या संशयामुळे अर्ध्या वाटेतच उतरविले, नंतर रेल्वेची दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:11 AM

गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले.

- हितेन नाईकपालघर : जर्मनी (फ्रँकफर्ट) येथून आल्याचे कारण देत बांद्रा येथून गरीबरथ एक्सप्रेस पकडून बडोदा येथे घरी जाणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत तिकीट तपासनिसाने पोलिसी बळाचा वापर करीत जबरदस्तीने पालघर स्थानकावर बुधवारी उतरवले. या चारही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावर वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सत्य चौकशीअंती समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. शेवटी हजारो रुपयांचा भूर्दंड सहन करीत त्यांना खाजगी वाहनाने आपल्या घरची वाट धरावी लागली. तसेच तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस अ‍ॅप टाकण्यात आले असून त्यांनी पुढील १४ दिवस आपले घर सोडून अन्य ठिकाणी जाण्याबाबत लक्ष ठेवले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.देशभरातून ३०० विद्यार्थी जर्मनीच्या इसेन्ट येथील विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. त्यातील बडोदा, सुरत, भावनगर येथील चार विद्यार्थी हे एअर इंडियाच्या विमानाने बुधवारी (एआयओ १२४) विमानतळावर उतरले. दोन तास इमिग्रेशन तर दीड तास वैद्यकीय कक्षात तपासणी केल्यानंतर त्यांच्या हातावर ‘होम कोरन्टईन’ असा शिक्का मारण्यात आला. प्रवासात मास्क आणि सॅनिटाईझर वापरण्याच्या सूचनेनुसार चौघांनीही सर्व साहित्य खरेदी करीत गरीबरथ सुपर फास्ट एक्सप्रेस पकडली. ही गाडी बोरिवली येथे आली असताना नव्याने चढलेल्या काही नजीकच्या प्रवाशांनी तुम्ही कुठून आलात, अशी विचारणा केली. जर्मनीवरून आल्याचे सांगितल्यानंतर परदेशातून इथे कोरोना घेऊन आलेत का? असे त्यांना सुनावून त्यांची तक्र ार बोगीतील तिकीट तपासनीसाकडे केली. तिकीट तपासनिसाने चौघांनाही एका वेगळ्या बोगीत जायला सांगितल्याचे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले. जर्मनीतून आलेले चार प्रवासी कोरोना संशयित असल्याची तक्रार रेल्वेच्या टिष्ट्वटरद्वारे करण्यात आल्यानंतर तिकीट तपासनिसांनी ट्रेनला थांबा नसतानाही चौघांना पालघर स्थानकात उतरविले. आम्हाला १४ दिवस घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने आम्ही सर्व प्रकारच्या दक्षता घेऊन आपल्या घरी जात असल्याचे सांगूनही आम्हाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत जबरदस्तीने उतरविण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.या विद्यार्थ्यांना पालघर स्थानकात उतरवण्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांची पूर्ण चौकशी केली. हातावर असलेल्या होम कोरोन्टईनच्या शिक्क्यामुळे रेल्वेने प्रवास न करता खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. यामुळे त्यांनी पालघरमधून भाड्याने खाजगी वाहन घेत ते घरी रवाना झाले.पालघर रेल्वे प्रबंधक मिलिंद कीर्तिकर, स्टेशन मास्तर आणि आरोग्य यंत्रणेचे अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडे दिलगिरीही व्यक्त केली. परंतु याबाबत तिकीट तपासनिकाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे का? अशी विचारणा पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांना विचारले असता त्यांनी कारवाई होणार नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वे