वसई - वसई-विरारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून ती आता 9 वर गेली आहे. मागील चार दिवसापासून विरार, नालासोपारा त्यानंतर पुन्हा वसई रोड मधून असे बाधित आढळून आलेले असताना हा रुग्ण वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड परिसरात राहात असून हा रुग्ण 68 वर्षाचा जेष्ठ नागरिक आहे. मागील 8 आढळलेले रुग्ण हे सध्या मुंबईत कस्तुरबा व जसलोक सारख्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई रोड पश्चिम स्थित अंबाडी रोड परिसरात एका गृह संकुलात आढळलेल्या या 68 वर्षीय रुग्णाची कुठलीच ट्रॅव्हल हिस्ट्री नसून या रुग्णांस पूर्वीपासूनच मधुमेह असल्याने व चार दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 29 मार्च रोजी ते वसईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तिथे त्यांची सरकारने कोरोना चाचणीसाठी मान्यता दिलेल्या वसईतील एका खासगी लॅबमार्फत सर्व तपासणी केली असता त्याच्या तपासणीत हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पालिकेच्या नवघर माणिकपूर विभागाचे सहा. आयुक्त गिलसन घोंनसालवीस यांनी लोकमतला दिली.
दुसरीकडे सदर कोरोना संशयित रुग्ण हा खासगी लॅब च्या तपासणीत बाधित झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याउलट त्यांच्या घरातील पत्नीला खबरदारी म्हणून पुढील 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात पाठवले आहे. एकूणच गुरुवारी हा संशयित बाधित रुग्ण आढळून आल्याने हा रुग्ण ज्या भागात राहतो तो वसई पश्चिमेचा अंबाडी रोड परिसर व त्याच्या आजूबाजूचा परिसर महापालिका व माणिकपूर पोलिसांनी सतर्कता म्हणून ताब्यात घेत त्याभागात आता निर्जंतुकीकरण करून तो स्वछ करण्यास सुरुवात केली आहे. वसई-विरारमध्ये वाढते रुग्ण पाहता महापालिका व पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली असून नागरिकांनी खरोखरच गरज असेल तरच बाहेर पडावे व आपली आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका व पोलिसांनी पुन्हा पुन्हा केले आहे.
जेष्ठ रुग्णास मधुमेह आहे व श्वसनाचा त्रास होत असल्याने हा रुग्ण वसईतीलच एका खासगी रुग्णालयात रविवारी दाखल झाला होता. तिथे कोरोनासाठी मान्यता दिलेल्या खासगी लॅब मार्फत केलेल्या चाचणीत तो बाधित आढळून आला आहे,त्यास कस्तुरबा रुग्णालयात पुढील शासकीय कोरोना तपासणी व उपचारासाठी पाठवले आहे,हा परिसर संपूर्ण सील केला असून लागली च त्याभागात स्वच्छता व सर्वेक्षण कार्यक्रम घेऊन निर्जंतुकीकरण ही सुरू केलं आहे.
- गिलसन घोनसालवीस, एच प्रभाग, सहायक आयुक्त, नवघर माणिकपूर शहर विभाग
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'कोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे मात्र अंमलबजावणीची पद्धत चुकीची'
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत
Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू
Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...
Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू
Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त