शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

Coronavirus : कोरोनामुळे तारापूरच्या उद्योगांचे कंबरडे मोडणार, उद्योग ठप्प होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:53 AM

आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

- पंकज राऊतबोईसर : पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध प्रकारच्या कारवाईच्या टांगती तलवारीबरोबरच आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट लांबल्यास हजारो कोटींच्या नुकसानीबरोबरच कंत्राटी कामगारांची अवस्था दयनीय होऊन एकूणच त्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन आर्थिक स्थिती कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई व इतर अनेक कारणे व समस्यांमुळे अनिश्चितता व अस्थिरतेत असतानाच कोरोना हा विषाणू देशात येऊन धडकल्याने आता चहूबाजूने आलेल्या संकटाला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत येथील उद्योजक असून उद्योगांची चाके अधिक रुतून विकासाची गती मंद होण्याची शक्यता आहे. देशावर येऊ घातलेल्या संभाव्य संकटाला समर्थपणे तोंड देऊन ते परतवण्याचे तारापूरच्या उद्योजकांच्या संघटनेने (टीमा) उद्योजकांना आवाहन केले आहे.तारापूर येथे रासायनिक, औषधे, स्टील टेक्स्टाईल असे लहान, मध्यम व मोठे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग असून त्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, अधिकारी आणि उद्योगांची जोडधंदा व्यवसायाशी संबंधित असे डायरेक्ट व इनडायरेक्ट मिळून अडीच ते तीन लाखापर्यंत लोकांचा रोजगार अवलंबून आहे.उत्पादन करणाºया कारखान्यात ‘वर्कफ्रॉम होम’ शक्य नाही तसेच मुळातच कमीत कमी अथवा आवश्यक तितकेच कामगार, सुपरवायझर व इतर स्टाफचा वापर करून सध्या सर्वत्र काम केले जात असतानाच निम्म्या कामगारांच्या उपस्थितीत उत्पादन घेणे अशक्य तर आहेच, त्यातच धोकादायक रासायनिक कारखान्यात मुळातच कमी असलेली कामगार कपात करून उत्पादन घेणे हे सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळायची असेल तर धोका पत्करून उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा ते तात्पुरते बंद ठेवणे हा एकमेव पर्याय असून त्यामुळे उद्योगांबरोबरच कामगारांनाही आर्थिक संकटाशी सामना करावा लागणार आहे, परंतु राष्ट्रीय हित व सर्वांच्या आरोग्याला असलेला धोका पाहता सर्व संकटाला समर्थपणे तोंड देणे गरजेचे आहे.तारापूर एमआयडीसीमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे ठाणे, मुंबई, वसई, विरार, पालघर, डहाणूपासून ते वापी येथून येत असतात.कोरोनामुळे जगभरातील उद्योगाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. खरे तर इतर देशातील जनता भारतात घेतल्या जाणाºया दक्षतेचे कौतुक करीत आहे. आपणही शासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. मोठे संकट टाळण्यासाठी उद्योगांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.- डी.के.राऊत, अध्यक्ष,तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्था