नालासोपारा : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी राज्य सरकार एसटीमार्फत सोय करणार असल्याची बातमी सर्वत्र वाºयासारखी पसरल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील बस डेपोमध्ये चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी जमू लागले होते. हळूहळू गर्दी वाढून शेकडो लोक जमा झाले. मात्र गाडी सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नालासोपारा पोलीस एसटी डेपोमध्ये पोहचले आणि त्यांनी सर्वांना समजावून घरी पाठवले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या ४८ दिवसांपासून देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तेव्हापासून अनेक मजूर, कामगार, चाकरमानी अडकून पडले आहेते. कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी जाणारे चाकरमानी गावाला जाण्यासाठी प्रयत्न करत होते, पण लॉकडाऊनमुळे आणि पोलीस प्रशासन दाखल करत असलेल्या गुन्ह्यांमुळे नागरिक हतबल झाले आहेत. त्याच वेळी परिवहन मंत्र्यांनी एसटी सोडण्याची घोषणा केल्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या चाकरमान्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यातूनच हे लोक नालासोपारा एसटी स्थानकात जमा झाले.लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले गंभीर प्रश्न उपस्थित करत, लोकांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. मात्र पोलिसांनी त्यांना सर्वांना समजावून घरी जाण्यास सांगितले. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यामुळे येथे कोणतीही गडबड झाली नाही.आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, येथे आता असह्य होत आहे, असे काही चाकरमानी डेपो कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना सांगत होते. परप्रांतीय लोकांना मोफत त्यांच्या गावी पाठवण्यात आले, परदेशांतून श्रीमंत लोकांना मायदेशात आणले. सरकारने राज्यातील लोकांना एसटीने सोडू असे सांगितले, परंतु त्यासाठी भरपूर अटी घातल्या आहेत. एवढ्या अटी का, असा सवाल लोकांनी केला.
coronavirus: नालासोपारा डेपोमध्ये गावी जाणाऱ्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:45 AM