मनोर : पालघर पूर्वेत मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिलायन्स पाईप लाइनबाधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पैशांचा गैरव्यवहार करून पैसे लाटणा-या आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ पोलिसांना क्वारंटाईन केले. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या संपर्कात आणखी किती लोक आले, ते पाहावे लागेल.जामीन अर्ज नामंजूर : अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित पाच आरोपींची कोठडी २ जुलै रोजी संपली. त्यामुळे आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
coronavirus: एका आरोपीमुळे आठ पोलीस क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 11:50 PM