शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

Coronavirus: वसईव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्र ‘रेड झोन’मधून वगळा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 6:14 AM

खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे

वसई/जव्हार : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर आणि डहाणू असे तीन तालुके वगळता उर्वरित तालुक्यांत रुग्णसंख्या शून्य आहे. मात्र संपूर्ण जिल्हा ‘रेड झोन’ घोषित केला आहे. यामुळे जास्त रुग्णसंख्या असलेला वसई तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्र ‘रेड झोन’मधून वगळण्याची मागणी पालघरचे खा. राजेंद्र गावित आणि विक्रमगडचे आ. सुनील भुसारा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. तर वसई, पालघर आणि डहाणू असे तीन तालुके वगळता उर्वरित तालुक्यात रुग्णसंख्या शून्य आहे. संपूर्ण जिल्हा ‘रेड झोन’ घोषित केल्याने येथील अनेक उद्योगधंद्यांवर याचा मोठा परिणाम होईल तसेच लोकांना रोजगारही मिळणार नाही. त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने पालघर जिल्ह्यातील एकमेव वसई-विरार शहर महापालिकेचे क्षेत्र वगळता इतर भाग हा ‘आॅरेंज झोन’मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, विक्रमगड विधानसभेचे आ. सुनील भुसारा यांनीही सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशीच मागणी केली आहे. संपूर्ण पालघर जिल्हा रेड झोन घोषित केल्याने अनेक उद्योगधंदे व कारखाने यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वसई व वसई - विरार महानगरपालिका व इतर तालुके असे दोन स्वतंत्र वेगवेगळे विभाग करावेत, जेणेकरून उर्वरित तालुक्यातील अनेक उद्योगधंदे व कारखाने सुरू करणे शक्य होईल. याबाबत उचित कार्यवाही करण्याची मागणी भुसारा यांनी केली आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस