शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

CoronaVirus News: कोरोनामुळे घडी विस्कटली; आर्थिक संकटाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:42 PM

अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.

- पंकज राऊतबोईसर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे गेल्या अडीच-तीन महिन्यांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा गंभीर परिणाम छोट्या-मोठ्या व्यावसायिकांबरोबरच उद्योगजगत, नोकरदार तसेच हातावर पोट भरणाऱ्यांवर होऊन या सर्वांचेच अर्थकारण अक्षरश: कोलमडून गेल्याने जगायचे कसे, या चिंतेत उद्योजक, व्यावसायिक तसेच नोकरदार आहेत.कोरोनाची साखळी तुटून त्याचा प्रसार व प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच देशातील करोडो नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवून हाहाकार माजू नये म्हणून लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नव्हता. हे वास्तव असले तरी त्याचा गंभीर परिणाम ग्रामपंचायतीपासून राज्य व केंद्राच्या तिजोरीवरही झाला आहे. परंतु, खरी आर्थिक झळ ही गरिबातील गरीब व श्रीमंतांनाही बसून मध्यमवर्गाची स्थिती दयनीय झाली आहे. एका बाजूला कोरोना तर दुसºया बाजूला आर्थिक संकट यामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी सावरून पुन्हा कधी रुळांवर येईल, याबाबतही अनिश्चितता असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.कोरोनाच्या संकटामुळे फक्त दूध, किराणा, भाजीपाला, औषधांची दुकाने, गॅस वितरण, दवाखाने व रुग्णालये या अत्यावश्यक सेवा चालू राहिल्या. याव्यतिरिक्त सर्व उद्योगधंदे बंदच राहिले. जवळपास तीन महिने बंदीत गेल्यामुळे उद्योग नगरी व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने व प्रत्येक धंदा-व्यवसायातून, कामातून पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने कामगार, बिगारी, मोलकरणी, शेतकरी, शेतमजूर, मजूर, नोकरदार व हातावर पोट असणारे इत्यादी सर्वांना आज संघर्ष करावा लागत आहे. आज हजारोंच्या हाताला काम नाही. त्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. कोरोनासारख्या घातक विषाणूला रोखण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घरातच बसावे लागत आहे. त्यामुळे आज सर्व जण दुहेरी संकटात सापडले आहेत.उद्योग व कामगारांसमोर मोठे संकटसध्या उद्योगांना अनेक समस्या, अडचणी व संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने विशिष्ट ठिकाणी मॅनपॉवरचा तुटवडा जाणवतो, तर कच्च्या मालाचा पुरेसा व जलदपणे पुरवठा होत नसून आंतरराष्ट्रीय बाजारपेठही ठप्प झाल्याने उद्योगांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कापड उद्योग उभारी घेण्यासाठी अवधी लागेल तर बल्क ड्रग्ज व फार्मास्युटिकल्स उद्योगांना चांगली संधी असली, तरी उद्योगांसमोर असलेल्या विविध अडचणींमुळे या उद्योगावर अवलंबून असलेला कामगार व जोडधंदा व व्यवसाय करणारे मात्र मेटाकुटीला येऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या