वसई - वसई -विरार शहरात रविवारी बाधित रूग्ण घटले असून 162 रूग्ण आढळून आले तर दिलासादायक म्हणजे रविवारी शहरात एकही मृत्यू झाला नाही. याउलट दिलासादायक बाब दिवसभरात सर्वाधिक अशा 190 रुग्णांना घरी सोडण्यात देखील आल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान, रविवारी वसई- विरार शहर महापालिका हद्दीत 162 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने आता एकूण बाधित रुग्ण संख्या ही 14 हजार 660 वर पोहचली आहे. तर दिलासादायक म्हणजे रविवारी दिवसभरात पालिका हद्दीत एकही मृत्यू झालेला नाही. याऊलट आता पालिका हद्दीत आजवर एकूण 305 रूग्ण मयत झाले आहेत. त्यासोबत शहरात एकूण 2 हजार 509 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार ही घेत आहेत. यामध्ये वसई - 59 , वसई-विरार-2 , नायगाव- 4 नालासोपारा- 37 आणि विरार- 60 तसेच यात एकूण 86 पुरुष व 76 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.दिलासा ; आज ही सर्वाधिक 181 रूग्ण झाले मुक्त !वसई विरार शहरात पुन्हा 181 रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे.तर आजवर मुक्त रुग्णाची एकुण संख्या आता 11 हजार 846 वर पोहचली आहे.
coronavirus: मुंबईशेजारच्या वसई-विरारमधून आली गुड न्यूज, दिवसभरात एकही कोरोनाबळी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 9:32 PM