- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी : कोरोना विषाणूमुळे मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने त्याच्या किमती गगनाला पोहचल्या आहेत. दरम्यान, पाड्यावरच्या जिल्हा परिषद टोकेपाडा शाळेतील चौथीची विद्यार्थिनी अगस्ती माच्छी हिने हातरुमाल आणि हेअर बॅण्डपासून मास्क बनवला आहे. तिने त्याचे प्रात्यक्षिक अन्य विद्यार्थ्यांनाही दाखवले.घोलवड केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकेपाडा शाळेत चौथीत शिकणारी अगस्ती माच्छी ही शाळेतील एकमेव विद्यार्थिनी मंगळवारी मास्क घालून आल्याने सर्वच विद्यार्थी तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. तर काही तिला पाहून हसत होते. १६ मार्चपासून जिल्हा परिषद शाळांचे सकाळचे सत्र सुरू झाले असून १७ मार्चपासून ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यापूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन सत्र घेण्याचे नियोजन करीत असताना अगस्तीच्या प्रयोगाविषयी त्यांना कळले. त्यांनी तिच्या हुशारीचे कौतुक करून प्रक्रि या समजून घेतली.अगस्ती म्हणाली की, टीव्हीवर मास्कविषयी चर्चा ऐकली. गावातही काही चेहरे मास्क घालून होते. मलाही ते घ्यावेसे वाटले. मात्र ते गावच्या दुकानात उपलब्ध नसल्याने कुठे मिळवितात हे माहीत नव्हते. यावर उपाय म्हणून हातरुमाल घेऊन त्याची लांब घडी केली. त्यामध्ये केसांना लावलेले रबर ठेवून रुमालाची दोन्ही टोके जोडून घेतली. तो रुमाल तोंडाला लावून दोन्ही कानाला हेअरबॅण्ड अडकवले. मी पालकांना मास्क दाखवल्यावर त्यांनी कौतुक केले. शाळेत घालून आल्यावर शिक्षकांनी शाबासकी दिल्याचे ती म्हणाली.‘अभ्यासाव्यतिरिक्त विविध कार्यक्र म आयोजित केले जातात. कलाकुसरीच्या वस्तू बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कागदापासून विविध आकाराच्या नक्षीकामाचे तंत्र शिक्षकांनी शिकवले होते. त्याद्वारे ही कल्पना सुचली. त्याचे सर्वांनी खूप कौतुक केले.’- अगस्ती माच्छी (विद्यार्थिनी)
Coronavirus : विद्यार्थिनीने घरीच बनवला रुमालाचा मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:35 AM