शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 11:33 PM

CoronaVirus News in Palghar district : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत.

पालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळात खूपच वाढला होता. अद्यापर्यंत एकूण बाधितांच्या संख्येने ४१ हजारांचा टप्पा पार केलेला आहे. कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊन बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता होती, मात्र प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेने दिवस-रात्र मेहनत घेऊन या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असून त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या जीवघेण्या आजारात १ हजार ४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यामध्ये वसई-विरार महानगरपालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मुंबई-ठाणेच्या नजीक असलेल्या या महानगरातील लोक मुंबई-ठाणे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जात असल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला हे उघड आहे.वसई-विरारमध्येच २६ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी चिंता व्यक्त होत होती, मात्र आता या परिसरातही बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरारमधील २५ हजार ६७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. वसई-विरार परिसरात या आजारात ७५६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या वसई-विरारमध्ये केवळ ५६४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्याच वेळी एकूण रुग्णसंख्या आणि बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचेच दिसून येत आहे. अर्थात यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत खूपच महत्त्वाची आहे.महत्त्वाची आहे.

तलासरी कोरोनामुक्तपालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच या तालुक्यात एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. तालुक्यात एकूण २५५ रुग्ण बाधित आढळलेले होते. मात्र त्यापैकी २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ४ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस