शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

CoronaVirus News: विरार, नालासोपारा कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 12:16 AM

दिवसभरात ४६४ रुग्ण : उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार हजारहून जास्त

- मंगेश कराळेनालासोपारा : वसई-विरारमध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान माजवले असून आतापर्यंत उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा चार हजाराच्यावर गेला आहे. विरार आणि नालासोपारा शहरात आढळणारी रुग्णसंख्या सर्वाधिक असून या शहरातील जनजीवन सध्या भीतीखाली आहे. तिन्ही शहरांत कोरोना विषाणूचा कहर माजला असून आता आढळणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.विरारच्या झोपडपट्टी परिसर आणि नालासोपाऱ्याच्या मिनी धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एन्ट्री केल्याने समूह संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या व आरोग्य विभागात चिंतेत वाढ झाली आहे. आधीच कोरोनाग्रस्तांचा आकडा दुपटीने वाढत असून त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांनी या काळात अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.वसई-विरारमधील रुग्णालयांतील खाटादेखील फुल्ल झाल्या असल्याने रुग्णांची उपचाराविना परवड होत आहे. अशात समूह संसर्गाची चिंता महापालिका प्रशासनाला भेडसावत आहे. मागील दोन दिवसात विरारमध्ये ५३७ तर नालासोपारा शहरात ५३२ रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा धोका अजून वाढला आहे.वसई-विरारमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची चार हजारांच्या वर गेल्याने महापालिकेची चिंतादेखील वाढली आहे. नागरिकांनी आपत्ती काळाचा धोका पाहता विनाकारण घराबाहेर अद्यापही पडू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण होत असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर आता ताण येऊ लागला आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनाची संख्या कमी झाल्यावर राज्य शासनाने नियम शिथिल केल्यानंतर मोठी गर्दी ठिकठिकाणी आली होती. साहजिकच त्याचा फटका कोरोना वाढीमध्ये बसत आहे.सर्वाधिक रुग्ण विरार, नालासोपारा शहरांतविरार आणि नालासोपाऱ्याच्या पूर्व पश्चिम परिसरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून विरार व नालासोपारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ४ हजार १९३ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील सात दिवसांत विरार शहरात सर्वाधिक १२५५ रुग्ण आहेत. नालासोपारा शहरात ११२६ रुग्ण, वसई शहरात ९६० रुग्ण तर नायगाव शहरात १२५ रुग्ण आढळले आहेत. सात दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील आठ दिवसांतील आकडेवारीदिनांक     वसई     नालासोपारा     विरार     नायगाव१ एप्रिल      १०८       ९२       ११४       ११२ एप्रिल       १३२       १२४       ९४       ८३ एप्रिल      ८३       ८३       १७५       ६४ एप्रिल      १४६       १३५      १३८      १२५ एप्रिल      १३९      १५०      १९७      ३१६ एप्रिल      १९४      ३२८      २५१      ३४७ एप्रिल     १५८       २०४       २८६       २३एकूण     ९६०       ११२६       ११५५       १२५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या