वसई :- वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी पुन्हा सर्वाधिक गुणाकार करीत 62 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, धक्कादायक म्हणजे एकट्या वसई नायगावमध्ये 27 रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक म्हणजे नालासोपारा पूर्व भागातील 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर पालिका हद्दीत नालासोपारा, विरार पूर्व भागातून 5 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.किंबहुना सोमवारी देखील दिवसभरात एकूण 62 रुग्णांची वाढती आकडेवारी आणि गंभीर म्हणजे हे सर्व रुग्ण बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने यात सुरक्षारक्षक, बँक, अग्निशमन दल, प्लंम्बर, नर्स, दुकान चालक, वॉर्डबॉय, रुग्णालय कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी, गरोदर महिला स्वच्छता कर्मचारी आदींचा समावेश असल्याने ही वाढती संख्या व होत असलेला गुणाकार पुन्हा शहराची चिंता वाढवणार आहे. त्यामुळे आता सोमवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 553वर पोहोचली आहे.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये 39 पुरुष तर 23 महिलाचा समावेश आहे. यात वसईतील 4, 6 व 12 वर्षांच्या मुला-मुलीचा समावेश असून, वसईतील 17 पुरुष व 10 महिला आहेत. तर नायगावमधील 1 पुरुष व 3 महिला आहेत, नालासोपारातून 2 महिला व 12 पुरुष आहेत आणि विरारमधील 9 पुरुष व 8 महिला रुग्णाचा समावेश आहे. चिंताजनक म्हणजे पुन्हा एकदा नालासोपारा पूर्वेस 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे आता एकूण मृत्यूची संख्या 19 वर पोहोचली आहे. या सर्व रुग्णांवर वसई, नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून वसई-विरार हद्दीत एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णाची एकूण संख्या 300 वर पोहचली आहे.वसई-विरार हद्दीत 5 जण कोरोनामुक्त!वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी नालासोपारा पश्चिम 3 आणि विरार पश्चिममधून 2 असे एकूण 5 जण कोरोनामुक्त झाले असल्याने आता एकूण कोरोनामुक्त संख्या 234 झाली आहे.
Coronavirus News: चिंता वाढली! वसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 553वर पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 9:01 PM