- आशिष राणे
वसई: विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी वसई विरार शहर महापालिका हद्दीत पुन्हा सर्वाधिक असे 24 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब पालिका हद्दीतील 8 रूग्ण मुक्त देखील झाले आहेत. तर धक्कादायक म्हणजे विरारमध्ये 11 व 16 वर्षाची 2 मुले तर नालासोपारात 19 व 20 वर्षाची मुलं-मुली कोरोना बाधित आढळून आल्याने शहराची चिंता वाढली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता सोमवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 342 वर पोहचली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये एकूण 14 पुरुष तर 8 महिलाचा समावेश आहे. यात खास म्हणजे नालासोपारा भागातील 20 वर्षे मुलीचा समावेश आहे,तर विरार मधील 11 व 16 वर्षांची दोन मुले देखील आहेत सोबत अर्नाळा ग्रामीण भागातील 32 वर्षीय तरुणाचा ही समावेश आहे,
विशेष म्हणजे सोमवारी वसईतून 1 महिला व 3 पुरुष तर नायगाव मधून 2 महिला व 2 पुरुष वाढले आहेत. तसेच पालिका हद्दीतील नालासोपारा मधून 5 पुरूष व 5 महिला तसेच विरार मधून फक्त 6 पुरुष वाढले आहेत. या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 342 वर पोहचली असून यात पालिका हद्दीत एकूण 13 जण मयत झाले आहेत.
वसई- विरार हद्दीतील 11 जण कोरोना मुक्त
तर सोमवारी पालिका हद्दीत वसई 3 विरार पूर्व पश्चिम 2 आणि नालासोपारा मधून 3 असे एकूण 11 जण कोरोना मुक्त झाले असल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे आता कोरोनाची एकूण मुक्त संख्या ही 171वर गेली आहे,तर आजवर 158 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दिनांक-18 मे 2020 सोमवार ची कोरोना रुग्णांची आकडेवारी
वसई-3 महिला ,5 पुरुषनालासोपारा -5 पुरुष 5 महिलाविरार -6 पुरुष एकूण रुग्ण संख्या -24वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -342कोरोना मुक्त संख्या :- 171कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 13उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-158