पारोळ : वसई-विरार शहराप्रमाणेच वसईच्या ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र यासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे याचा परिणाम हा आरोग्य यंत्रणेवर झाला आहे.वसईच्या शहराला जोडूनच ग्रामीण परिसर आहे. या परिसरात एकूण ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील अर्नाळा, कळंब, चंद्रपाडा, आडणे, तिल्हेर, पाणजू, भाताने, खोचिवडे, वासलई, रानगाव, सत्पाळा, पोमन, टिवरी, टेंभी कोल्हापूर भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये डॉक्टर, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यासह इतर कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. परंतु आरोग्य सेवेतील कर्मचाºयांनाही कोरोनाची लागण होत असल्याने आरोग्य विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कामण उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य कर्मचाºयांचे कोरोनाचे नमुने नुकतेच पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एक एक करून कर्मचारी कमी होऊ लागला आहे. यामुळे काम करण्यासही अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.वसईच्या ग्रामीण भागात एकूण २७९ कोरोनाबाधित रु ग्ण असून त्यामध्ये आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर १३० रु ग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही १२१ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत.
coronavirus: ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर वाढत्या संसर्गामुळे ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 11:57 PM