विरार : वसई-विरार महापालिकेच्या बेफिकिरीमुळे मृत्यू झालेल्या विरार-नारिंगी येथील ७८ वर्षीय कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांसोबत राहून मदत करणाऱ्यांपैकी तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.विरार-नारिंगी येथील या ज्येष्ठ नागरिकाला ३१ मे रोजी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अनेक रुग्णालये फिरल्यानंतर त्यांची १ जूनला कोरोना चाचणी करण्यात आली. ३ जूनला ती पॉझिटिव्ह आली. पालिकेकडून त्यांना रिद्धीविनायक रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेत चालकाशिवाय पालिकेचा कोणीही कर्मचारी नव्हता. त्याच्या मुलाला माझ्यासह अन्य तिघांनी या रुग्णाला रुग्णवाहिकेत बसवण्यासाठी मदत केल्याचे सुदीप कांबळे यांनी सांगितले. रुग्णालयात नेल्यानंतर तीन तास झाले तरी रुग्णाला दाखल करण्यास किंवा तपासणी करण्यास डॉक्टर आले नव्हते. या वेळेच्या अपव्यवयात रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर चार तास उलटूनही पालिकेचा कर्मचारी अला नव्हता, असे कांबळे यांनी सांगितले. या रुग्णाचा मुलगा, त्याची पत्नी आणि मुलगी आणि स्ट्रेचरवरून अॅम्बुलन्समध्ये ठेवणारे तिघे, तसेच रिक्षाचालक यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.मुलगा रुग्णालयात दाखल, प्रतिव्यक्ती २५० खर्चविलगीकरण कक्षात प्रतिव्यक्ती २५० रु पये खर्च करावे लागणार असल्याने प्रत्येकाच्या घरांत प्रत्येकी पाच व्यक्ती असल्याने १४ दिवसांसाठी त्यांना आठ ते दहा हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. मात्र, तेथून त्याला लीलावती रुग्णालयात हलवले आहे. तर, पत्नी आणि मुलीला वसईतील कॉलेजमध्ये विलगीकरण कक्षात ठेवल्याचे सुदीप कांबळे यांनी सांगितले.रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका आली तेव्हा पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्यासोबत का नव्हते? त्यामुळे त्यांना इतर दोघांनी रुग्णवाहिकेत स्ट्रेचरवरून ठेवले. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार घ्यायची?- महेश कदम, शहर सचिव, मनसेवसईतील रु ग्णालये कोविड रु ग्णांना तुच्छतेने वागवताना दिसतात. यामुळेच एका व्यक्तीचा नाहक जीव गेला आहे. रुग्णालयांनी माणुसकी दाखवणे अपेक्षित आहे. मात्र रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारून रु ग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मनस्ताप देत आहेत. याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे.- नरेंद्र पाटील, नगरसेवक
CoronaVirus News: रुग्णाला मदत करणाऱ्या तिघांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 11:55 PM