विरार : नालासोपारा येथील रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल असलेल्या कोविडच्या १३ रुग्णांना आतापर्यंत वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून टोलिझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असून याचा खर्च महापालिका उचलणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी तब्बसूम काझी यांनी दिली. तूर्तास रुग्णालयाकडून या इंजेक्शनचा वापर करण्यात येत असला तरी महापालिका ही इंजेक्शन्स मागवून रुग्णालयाला रिप्लेस करणार असल्याने या इंजेक्शनचा खर्च रुग्णाकडून घेऊ नये, अशी विनंती रुग्णालयाला करण्यात आली असल्याचे तब्बसूम काझी यांनी सांगितले.कोविडचा रुग्ण प्रथम अथवा द्वितीय टप्प्यात असेल तर बरा होतो, मात्र तृतीय टप्प्यात गेल्यास त्याला व्हेंटिलेटर, आयसोलेशन आणि टोलिझुमॅब या इंजेक्शनशिवाय पर्याय नसतो. परंतु टोलिझुमॅब इंजेक्शनचा सुरू असलेला काळाबाजार लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने या इंजेक्शन्सचा संचय करून दारिद्र्य व मध्यमवर्गीय रुग्णांना ही इंजेक्शन्स कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास या रुग्णांना दिलासा मिळेल.त्यामुळे टोलिझुमॅब इंजेक्शन्सचा महापालिकेने संचय करून ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निमेश वसा यांनी केली होती. मात्र टोलिझुमॅब इंजेक्शन्सचा संचय केला जाऊ शकत नसल्याची खंत तबस्सूम काझी यांनी व्यक्त केली.कोविडचा रुग्ण प्रथम अथवा द्वितीय टप्प्यात असेल तर बरा होतो, मात्र तृतीय टप्प्यात गेल्यास त्याला व्हेंटिलेटर, आयसोलेशन आणि टोलिझुमॅब या इंजेक्शनशिवाय पर्याय नसतो. परंतु या इंजेक्शनचा सुरू असलेला काळाबाजार लक्षात घेता वसई-विरार महापालिकेने रुग्णांच्या हिताचा विचार करता हा मोठा निर्णय घेतला आहे.
coronavirus: कोरोनाच्या तेरा रुग्णांना टोकलिझुमॅब इंजेक्शन, वसई पालिका खर्च उचलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 1:20 AM