शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Coronavirus: दुसऱ्या लाटेच्या भीतीने ट्रॅव्हल्सचे चाक पंक्चर?; मालक-चालकांमध्ये चिंता, व्यवसाय बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:30 AM

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत

सुनील घरत पारोळ : कोरोना काळात काही महिने बंद असलेला पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला. लोकही बाहेर पडू लागले. यामुळे आपले चाक आता रुळावर आले असे ट्रॅव्हल व्यावसायिकांनाही वाटू लागले. बंद असलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सर्व बसेस डागडुजी करून सज्ज केल्या; पण कोरोनाची दुसरी लाट आल्याने ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर होण्याच्या मार्गावर आहे.

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सच्या वाहनांची चाके रुतली होती. एक पैशाचेही उत्पन्न मिळाले नाही, उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहेत. बॅटऱ्या, टायर खराब झाल्याने दुरुस्तीचा खर्चही डोक्यावर बसला आहे. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक हात रिकामे झाले आहेत. टाळेबंदी उठावी, गाडी रस्त्यावर यावी, अशी अपेक्षा ट्रॅव्हल्स चालक-मालकांना आहे. २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता ही सर्व कुटुंबे अडचणीत आली आहेत. वसई, विरार, नालासोपारामध्ये २० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह करणारी हजारो कुटुंबे आहेत. या ट्रॅव्हल्सची किंमत ४० ते ५० लाख आहे. काहींनी कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाचा किमान मासिक हप्ता सव्वा लाख रुपये आहे. अनेक ट्रॅव्हल्स मालकांना कर्जाच्या हप्त्याची परतफेड करता आली नाही. वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू आहे. सध्या हा कर माफ केला आहे. ट्रॅव्हल्स सुरू झाल्यास नवीन कर भरावा लागेल. यासाठीही त्यांच्याकडे पैसा कमी पडणार आहे. 

गाडी रुळावर येत होती; पण...वसई, विरार, नालासोपारा, मनवेलपाडा येथून कोकणात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या मोठी आहे. खास करून गणपती, शिमगोत्सव यावेळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर काही प्रमाणात ट्रॅव्हल्स सुरू झाल्याने गाडी रुळावर येत होती; पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने व्यवसाय पुढे हा व्यवसाय चालवायचा की नाही, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.

कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. गाड्यांना भाडे मिळत नसल्याने बस खरेदी करताना घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न आहे. -  दिपेश घरत, ट्रॅव्हल व्यावसायिक 

भीतीने बसमधील प्रवास टाळून लोकं स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. कोरोना प्रादुर्भावात पर्यटन व्यवसाय उभारी घेत नसल्याने आता पुढे काय करायचे, हा प्रश्न आहे. - शैलेश मराठे, टूर्स व्यावसायिक, विरार 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस