वसई - वसई-विरार शहर मनपाच्या वसई पश्चिमेला सोमवारी दिवसभरात केवळ 2 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली.त्यामुळे आता वसई विरार मनपा हद्दीतील कोरोना रूग्णाची एकूण संख्या 88 झाली असून सोमवारी जरी पालिका हद्दीत रुग्ण संख्या कमी आढळून आली असली तरी देखील ही बाब आता चिंतेची बनते आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,वसई पश्चिमेला वास्तव्य करणाऱ्या 63 वर्षीय रूग्णास दम्याचा त्रास असल्याने तो आनंदनगर मधील एका खाजगी ब्रेथ केअर नामक सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता,त्याच्या कोविड चाचणीत हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला व सोमवारी सर्वत्र एकच पळापळ झाली.तातडीने या रूग्णास पालिकेने नालासोपाराच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले,आणि ते सेंटर सिल करीत सेंटर मधील सर्व 6 कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्वेब नमुने घेत ते कोविड चाचणी साठी पाठवून हा परिसर व सोसायटी सील करीत सॅनिटाईज करण्यात आली.तर याच वसई पश्चिमेतील 33 वर्षीय तरुण हा कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्यावर मुंबईतील ररुग्णालयात उपचार सुरू आहेत.एकूणच सोमवारी विरार नालासोपारा वगळता फक्त वसईत फक्त दोनच रुग्ण आढळून आल्याने ही बाब दिलासा देणारी आहे.तरी सोमवारी वसई विरार मधील एकूण संख्या 88 झाली असून आतापर्यंत 5 मयत असून आतापर्यंत एकूण 7 जण कोरोना मुक्त झाले आहेत.