प्रतिक ठाकुर
विरार : वसई-विरार शहरात करोनाचा शिरकाव उशिरा झाला असला तरी, आता मात्र बाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहेत. नालासोपारा पश्चिमेत करोनाची दोन रुग्ण आढळून आली आहेत.हे दोन्ही ही रुग्ण एकाच घरातील आहेत. या रुग्णाची आता कस्तुरभा रुग्णालयात तपासणी सुरु आहे. दरम्यान या घटनेने शहरात करोना बाधितांचा आकडा आठ वर पोहोचला आहे.
निळेगाव परिसरातील आशिर्वाद इमारतीत राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये आज करोनाची लक्षणे दिसून आली. यामधील पुरुष हा मुंबईच्या जसलोक रुग्णालयात काम करत होता. लॉकडाऊनच्या दरम्यान ही अत्यावश्यक सेवा चालु असल्याने हा व्यक्ती बसद्वारे रुग्णालयातही जाऊन आपली सेवा बजावत होता. त्यामुळे रुग्णालयात काम करता-करता त्याला करोनाची लागण झाली आहे. तसेच घरी आल्यावर या व्यक्तीचा पत्नीशी संपर्क झाल्याने तिलाही करोनाची लागण झाली.
दरम्यान दाम्पत्याला जेव्हा करोनाची लक्षणे दिसून आली त्यावेळी त्यांनी महापालीकेला या संदर्भात माहिती दिली. महापालिकेने यावेळी त्याची तपासणी करून दाम्पत्याला कस्तुरभा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर पालिकेतर्फे या व्यक्तीच्या सोबत राहणारा त्याचा मुलगा व सुनेला हॉटेलमध्ये विलग (हॉटेल क्वारंटाईन) करण्यात आले आहे. यानंतर पालिकेतर्फे संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी करून सॅनिटाइज करण्यात आला आहे. तसेच या घटनेने शहरात करोना बाधितांचा आकडा आठ वर पोहोचला आहे.
सदर इसम हा जसलोक रुग्णालयात काम करत आहे. त्याला रूग्णालयाच्या कामा दरम्यान करोनाची लागण झाली. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीमध्येही करोनाची लक्षणे दिसून आली आहेत. या दोघांना कस्तुरभा रुग्णालयात पाठवले आहे. तसेच या व्यक्तीच्या मुलगा व सुनेला हॉटेल क्वारंटाईन केले आहे.
-संतोष मुने सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ई