शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 2:48 AM

यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. 

- आशीष राणे वसई : पालघर जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई -विरार शहर हद्दीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी, उसगाव व पेल्हार या तीनही धरणांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा मुबलक व समाधानकारक साठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.एप्रिल-मे महिना उजाडला की धरणांची पाणी-पातळी खालावते आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव अशी चार शहरे व ग्रामीण भाग मिळून वसई-विरार महापालिका हद्दीत मोडतात. या चारही शहरांची किमान पुढील तीन महिन्यांसाठी काळजी मिटली आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट व सतत हात धुण्याने मुबलक साठा असूनदेखील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. पालघरसह वसई तालुक्यातील या तीन धरणांचा सरासरी एकूण साठा मिळून ३९.३७ टक्के इतका असल्याने जुलैअखेरपर्यंत किंवा त्याही पुढे वसईकर नागरिकांची पाण्याची मोठी चिंता मिटलेली असेल, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. या प्रयोगात पालिका यंदाही बºयापैकी यशस्वी झाल्याने धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हार मधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन पुरवले जाते.मागील वर्षी पाण्याची टंचाई थोडीफार भासली होती, मात्र जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि गतवर्षी जुलै-आॅगस्ट व सप्टेंबरनंतर देखील समाधानकारक पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी पालिकेने पाण्याचे उचित नियोजन केल्याने व अमृत योजनाही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने या वेळी धरणात पाण्याचा साठा समाधानकारक आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी गंभीर स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दररोज १८० एमएलडी पाणीपुरवठावसई-विरार शहराला मुख्यत: सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणांद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील वर्षापासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद केले. मात्र, त्याचा फार फरक पडणार नाही. त्यामुळे या मुख्य तीन धरणांतून अजूनही पुढील तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ म्हणजेच जुलैअखेरपर्यंत नियोजन पद्धतीने वसईतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. वसई-विरार महापालिका दररोज या तीन धरणांतून १८० एमएलडी पाणी उचलते. हे पाणी विविध भागांतून मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांना पोहोचवले जाते. दरम्यान, कडक उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागांत पाण्याची मोठी पंचाईत निर्माण होऊ लागली आहे.तीन धरणांतील ८ मेपर्यंतची स्थितीसूर्या व सूर्या टप्पा-३ म्हणजेच धामणी धरणातील सध्याचा पाण्याचा साठा १०८.७९१ घनमिलिमीटर इतका असून अद्याप एकूण ३९.३७ टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. उसगाव धरणात १.५८७ घनमिलिमीटर म्हणजेच ३१.९९ टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक असून पेल्हार धरणात ०.६२२ घनमिलिमीटर म्हणजे १७.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार