शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

coronavirus: कोरोनामुळे घरातच उरकले शुभमंगल सावधान; मास्क घालून विवाह, आशीर्वाद आॅनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:28 AM

नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते.

जव्हार : कोरोनामुळे अनेक वधू - वरांचा विवाह पुढे ढकलावा लागला. मात्र, मूळचे जव्हारचे आणि सध्या नाशिक, काठे गल्ली येथील राजन गोडबोले यांच्या मुलाचे शुभमंगल ठरलेल्या तारखेला घरातच करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान वधू-वरांनी मास्क घातला होता.नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते. नातेवाइकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमंत्रण दिले होते. दरम्यानच्या काळात लॉकडाउनची घोषणा झाली. पहिला, दुसरा, तिसरा असा लॉकडाउनचा कालावधी वाढतच गेल्याने नातेवाइकांनी विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता. पण दोन्ही कुटुंबीयांनी घरातच विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतल्याचे सर्वेशचे मामा हेमंत हंगेकर यांनी सांगितले.ठरल्या तारखेला विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर राजन गोडबोले यांनी नाशिक - मुंबईनाका पोलिसांना आॅनलाइन अर्ज केला, त्यात त्यांनी दोन लोकांची जाण्याची आणि दोन लोकांची येण्याची परवानगी देण्यात आली. लग्नाचे कपडे नसल्याने घरातच उपलब्ध असलेल्या कपड्यातच सर्वेश आणि वडील सोबत निघाले. राहता येथील खांबेकर कुटुंबातील पूजा, तिचे आई - वडील आणि भटजी अशा पाच जणांच्या उपस्थितीत खांबेकर कुटुंबाच्या राहत्या घरी हा सोहळा पार पडला. व्हिडीओ कॉलद्वारे २०० नातेवाइकांनी आशीर्वाद दिले.लग्न साध्या पद्धतीने करण्याचा प्र्रस्ताव आम्ही मुलीच्या वडिलांसमोर ठेवला होता. त्यांनी ते मान्य केले. आणि मुलाचा लग्नसोहळा आनंदात पार पडला. पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नाने आम्हाला पास उपलब्ध झाला. त्यांचे खूप आभार.- राजन गोडबोले (मुलाचे वडील) 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न