- हितेन नाईक, पालघरजिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने क्रीडांगणाच्या विकासासाठी आश्रमशाळा आणि ग्रामपंचायत पातळीवर वितरित केलेल्या २ कोटीच्या निधी वापरात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे केदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.नियोजन विकास मंडळाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना आदिवासी उपाययोजनेतर्गत क्रीडांगण विकासा साठी सन २०१५-१६ या सालाकरिता सुमारे दोन कोटींच्या अनुदानचे वाटप करण्यात आले असून या अनुदानातून कामे झाल्याचे कागदोपत्री दाखिवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कोणत्या प्रकारची कामे करण्यात आली आहेत या संदर्भात कुठलीही कागदपत्रे अथवा माहिती अधिकाऱ्या कडून पुरविली जात नसल्याची तक्रारही करण्यात येत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चे माजी सचिव केदार काळे, नगरसेविका उज्वला काळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांची भेट घेत या प्रकरणी कसून चौकशीची मागणी केली आहे.पालघर जिल्ह्यात अनेक उदयोन्मुख खेळाडू असून जिल्हा,राज्य पातळीवर आपली चमक दाखवीत आहेत.मात्र या जिल्हा क्रीडा विभागा कडून त्यांना हव्या असलेल्या सोयी सुविधा, क्र ीडांगणे आणि साहित्याचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या मध्ये विशेष नैपुण्य असूनही विशेष चमक दाखवता येत नाही.अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. शाळा, ग्रामपंचायती, विविध क्र ीडा मंडळे इ, ना लाखो रु पयांचे अनुदान वाटप करताना त्याचा योग्य वापर करण्यात आला आहे का? क्र ीडापटू ना त्याचा फायदा होतो का? याचा तपास हि जिल्हाप्रशासनाने घ्यावा.पालघर तालुका क्र ीडा संकुलाचे काम अनेक वर्षा पासून अपूर्णावस्थेत पडून असून बॅडमिंटन हॉल चे कामही अपूर्ण आहे. सध्या त्याचा वापर प्रशासना कडून व्होटिंग मशीन इ, साहित्य ठेवण्यासाठी एक गोदाम म्हणून करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा कडे क्र ीडा संकुलाचा सुमारे ३० लाखाचा निधी पडून असल्याने नवीन निधी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.त्या मुळे हा निधी तात्काळ खर्च करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही या वेळी करण्यात आली. जिल्हाक्रीडा कार्यालयही सुरु झालेले नाही, पुण्यातील राज्य क्र ीडा संचालनालयाने ठाणे जिल्हा क्र ीडा कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती पालघर जिल्ह्यात केली असतानाही त्यांना ठाण्यातून पदमुक्त केले जात नाही. त्याचा विपरीत परिणाम क्र ीडा धोरणावर होत असल्याचे काळे यांनी निदर्शनास आणून दिले.
२ कोटींच्या क्रीडांगण निधीत भ्रष्टाचार
By admin | Published: September 25, 2016 3:57 AM