शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अपात्र उमेदवार ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:29 PM

पालघर नगर परिषदेची रणधुमाळी; छाननीमध्ये भाजपाच्या दोघींना नगरसेवकपदाची लॉटरी

पालघर : महिला दिनी पालघर नगर परिषदेच्या दोन इच्छुक महिला उमेदवारांना विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाची लॉटरी लागली असली तरी अर्ज बाद झालेले नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांचा मुलगा प्रथमेश पिंपळे, अपक्ष निहारिका संखे आणि काँग्रेसच्या कृपाली संखे हे न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याने त्याचा काय निकाल लागतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.पालघर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान शुक्रवारी प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपाच्या उमेदवार अलका राजपूत आणि प्रभाग १० मधील गीता संखे या दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांच्या अर्जात सूचक नसणे, स्वाक्षरी नसणे आदी त्रुटीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज बाद केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. महिला दिनाच्या दिवशीच दोन्ही महिलांची निवड झाल्याने भाजपाने फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला होता. पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठी १४८ तर नगराध्यक्ष पदासाठी ११ अर्ज दाखल झाले होते.शुक्रवारी सकाळी ११ वाजता छाननीला सुरु वात झाली. यावेळी प्रभाग क्र मांक ७ ब (सर्व साधारण महिला) भाजपाच्या उमेदवार अलका राजपूत यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आरती हिमालय संखे, भाजपाच्या (डमी) प्रीती विवेक सामंत तर अपक्ष निहारिका नैवद्य संखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर प्रभाग क्र मांक १० अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मध्ये भाजपाच्या उमेदवार गीता पिंपळे यांच्या विरोधात काँग्रेसच्या कृपाली कमलेश संखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील उमेदवारांच्या अर्जात सूचक नसणे, स्वाक्षरी नसणे, प्रभागा बाहेरचे सूचक नेमणे आदी चुका आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी ११ उमेदवारांना छानणीत अपात्र ठरविले. त्यामुळे भाजपाच्या राजपूत आणि पिंपळे याची बिनविरोध निवड झाली. तर १४८ उमेदवारी अर्जा पैकी १५ उमेदवारांनी भरलेल्या २४ नामनिर्देशित पत्रावर पक्षाचे ए-बी फॉर्म नसल्याने त्यांनाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. त्यामुळे १४८ उमेदवारी अर्जा पैकी ३५ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून ११३ अर्ज पात्र झाले.१३ मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अपात्रते प्रकरणी प्रथमेश पिंपळे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील गंडातंर न्यायालयत दुर होईल असे सांगितले.छानणीत अपात्र ठरविलेल्या ११ उमेदवारांची नावे१ ब) रश्मी यादव७ ब) आरती संखे७ ब) निहारिका संखे८ ब) भारती फासे९ ब) प्रथमेश पिंपळे१० अ) वृषाली संखे१० ब) आदित्य संखे११ ब) भूषण संखे१२ ब) अशोक पाटील१२ ब) सुनील राऊत१३ ब) चंद्रकांत राऊत

टॅग्स :palgharपालघर