नागोठणे : येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात आंदोलनास बसणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा शनिवारी ५१ वा दिवस आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने पहिल्या फेरीत २२१ प्रकल्पग्रस्तांची यादी रोह्याच्या प्रांताधिकारी यांचे कार्यालयात दोन दिवसांपूर्वी देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली. प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने याची तातडीने दखल घेत या नावांची छाननी करण्यासाठी प्रांताधिकारी पेण तसेच रिलायन्स आणि समितीला काही प्रतिनिधी देण्यात यावे असे कळविण्यात आले आहे, असे मिणमिणे यांनी सांगितले. संबंधित नावांची यादी कायम झाली तरी रिलायन्स उर्वरित प्रकल्पग्रस्तांना घेण्याबाबत संघटनेला जोपर्यंत अधिकृत पत्र देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, आमच्या आंदोलन समितीच्या मागणीनुसार रिलायन्स कंपनी उर्वरित सर्वच प्रकल्पग्रस्तांना काही काळात नोकरी देईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिलायन्सविरोधी आंदोलनाचा ५१ वा दिवस; नोकरी मिळण्यासाठी २२१ जणांची यादी शासनाकडे - गंगाराम मिणमिणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 8:22 AM