डहाणू : स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही डहाणू तालुक्यातील आदिवासी पाड्यांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागतो आहे. जग चंद्रावर पोचले. मात्र येथील डोंगर दर्यात राहणाऱ्या आदिवासींना विजेसाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. या बाबत माकपने सातत्याने पाठपुरावा करूनही वीजजोडणी सुरु न केल्याने बुधवार दुपारपासून महावितरणरच्या कार्र्यालयासमोर बेमुदत ठिय्या देण्यात आला आहे.विजेचा लपंडाव, भारनियमन, विजेचे अव्वाच्या सव्वा बील तसेच विशेष भरारी पथके याला. वीजग्राहक कंटाळले असतानाच डहाणूच्या मुसळपाडा, खुमारपाडा, वाकी प्रभुपाडा, कोशेसरी, शेनसरी , आंवढाणी, पावन, दाभोण, कवडास, ओसरवीरा, वांगर्जे, वेती इत्यादी जंगल पट्टी भागात अद्याप वीज पोचली नसल्याने येथील विकास खुटंला अहे परिणामी आदिवासीना अंधारात जीवन जगावे लागत आहे. डहाणू तालुक्याल गेल्या सहा महिन्यांपासून मीटर रिडिंग न घेता विजेचे अव्वाच्या सव्वा बिल पाठवले जात आहे.त्यात गंजाड, रायतळी, सरावली या भागात आदिवासींना ३५ हजाराचे बील. आल्याने महावितरणचा सावळागोंधळ समोर आलेला आहे परिणामी वीजपुरवठा खंडीत करुन आदिवासिंना अंधारात ठेवले जात आहे. डहाणू तालुक्यातील जंगल पट्टी भागात मुंबई अहमादाबाद हायवेच्या पलिकडे गावपाड्यांना वारंवार निवेदन देऊनही वीज पुरवली जात नसल्याने आदिवासींचे जीवन अंधारमय झाले आहे. दरम्यान कैनाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाकी प्रभुपाडा, खुमारपाडा येथे अद्याप विद्युतीकरण झालेले नाही. तसेच विजेचे खांब,विद्युत तारा जीर्ण व जुनाट झाल्याने ते त्वरीत बदलावे यासाठी माकपतर्फे डहाणू महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याबाबतीत वेळोवेळी आश्वासन देऊनही विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. अखेर बुधवारी बेमुदत ठिय्या देण्यात आला. यावेळी विनोद निकोले, गणेश आकरे, चंद्रकांत गोरखना आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
डहाणू महावितरण कार्यालयावर माकपचा ठिय्या
By admin | Published: March 30, 2017 5:24 AM